Earth Images : अद्भूत सौंदर्य….आपली पृथ्‍वी एका चकमकदार रत्‍नासारखीच!

Earth Images
Earth Images

पुढारी ऑनलाईन डेस्क:   पृथ्वीच्या सौंदर्याची अनभूती येणारी छात्राचित्रे SpaceX ने त्यांच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केली आहेत. यामधून पृथ्वीच एकाद्या रत्नासारखी भासते आहे. (Earth Images)

नासाच्या CLPS उपक्रमाचा भाग असलेला आणि खासगी अंतराळ कंपनी SpaceX कडून आयएम-वन (IM-1) मिशनचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. IM-1 अंतराळयाने नोव्हा-सी क्लास चांद्र लँडरने SpaceX च्या Falcon ९ रॉकेटच्या माध्यमातून गुरूवारी 1:05 वाजता प्रक्षेपित करण्यात आले. त्यानंतर सुमारे ४८ मिनिटांनी हे यान चंद्राच्या कक्षेत पोहचले. त्यानंतर लँडरशी प्रथम संवाद स्थापित करण्यात यंत्रणेला यश आले. पुढे या लँडरने अंतराळातून सुंदर पृथ्वीची छबी टीपली आहे. यामध्ये पृथ्वी जणू रत्नासारखीच दिसत आहे. (Earth Images)

'नासा, स्पेस-एक्स' च्या IM-1 मिशने टीपली पृथ्वीची छायाचित्रे

खासगी मालकीची अंतराळ संस्था SpaceX ने नुकत्याच प्रक्षेपित केलेल्या IM-1 (Intuitive Machines) यानाने चंद्राकडे प्रवास करताना, अतराळातून पृथ्वीची सुंदर छबी टीपली आहे. अंतर्ज्ञानी मशीन्स (IM-1) यानातील नोव्हा-सी लँडरने प्रथमच हे दृश्य टीपले आहे. या लँडरला 'ओडिसियस' असे नाव दिले आहे. यातून पृथ्वी एखाद्या चमकणाऱ्या रत्नासारखी भासत असल्याचे 'स्पेसएक्स'ने अंतराळ संस्थेने म्हटले आहे. (Earth Images)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news