पुढारी ऑनलाईन डेस्क : दूर्गापूजा हा भारतातील सर्वाधिक धर्मनिरपेक्ष उत्सव आहे, त्याला पूर्ण धार्मिक म्हणता येणार नाही, असे मत कलकत्ता उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. सार्वजनिक मैदानावर दूर्गापूजा आयोजित करण्यासाठी प्रशासनाने विरोध केला होता, हा वाद कलकत्ता उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर उच्च न्यायालयाने क्रीडांगणावर दूर्गापूजा आयोजित करण्यासाठी परवानगी दिली आहे. (Durga Puja a secular festival)
न्यायमूर्ती सब्यासाची भट्टाचार्य यांनी हा निकाल दिला आहे. कोलकता येथील एका मैदानावर दूर्गापूजा आयोजित करण्यासाठी परवानगी मागितली होती. पण प्रशासाने घटनेतील कलम २५नुसार सार्वजिक ठिकाणी धार्मिक पूजा आयोजित करता येत नाहीत, असे सांगत ही परवानगी नकारली होती. मानब कल्याण फाऊंडेशन या संस्थेने ही परवानगी मागितली होती. हा वाद उच्च न्यायालयापर्यंत गेला होता. बार अँड बेंच या वेबसाईटने ही बातमी दिली आहे. (Durga Puja a secular festival)
न्यायमूर्ती भट्टाचार्य म्हणाले, "लोकांची धारणा लक्षात घेतली तर दूर्गापूजा फक्त पूजाविधी आणि धार्मिक कार्यापुरते मर्यादित नाही. हा तो विविध संस्कृतींचा संगमही आहे. दूर्गापूजेवळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम ही असतात. त्यामुळे दूर्गापूजेचे स्वरूप धर्मनिरपेक्ष बनले आहे, तो एका समूदायाचा धार्मिक कार्यक्रम नाही. एका धर्माचा धार्मिक कार्यक्रम म्हणून त्याला संकुचित करता येणार नाही."
याचिकाकर्त्यांनी कलम १४ नुसार धार्मिक कार्यक्रम घेण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते. या संस्थेने न्यू टाऊन मेला ग्राऊंड या मैदानावर दूर्गा उत्सब २०२३ आयोजित करण्याची परवानगी मागितली होती.
"ज्या मैदानावर उत्सव आयोजित करण्याची परवानगी मागितली आहे, ते मैदान आहे. हा रस्ता किंवा फूटपाथ नाही, येथे खेळसुद्धा आयोजित होत नाहीत. विविध प्रदर्शनांसाठी हे मैदान राखीव आहे," असे निरीक्षण न्यायमूर्तींने नोंदवले. या मैदानावर दूर्गापूजा आयोजित केली तर त्याचा पोलिस प्रशासनावर ताण पडेल, असाही दावा प्रशासनाने केला होता, तो न्यायमूर्तींनी फेटाळला.
हेही वाचा