Drug mafia Lalit Patil : मी ससून मधून पळालो नाही, तर मला पळवलं; ललित पाटीलच्या विधानाने खळबळ

Drug mafia Lalit Patil : मी ससून मधून पळालो नाही, तर मला पळवलं;  ललित पाटीलच्या विधानाने खळबळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याने मोठं विधान केलं आहे. मुंबई पोलिस ललित पाटील याला न्यायलयात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना मी ससूनमधून पळून गेलो नाही, तर मला पळवलं गेलं आहे, असा मोठा गौप्यस्फोट ललित पाटील याने केला आहे. ललित पाटीलने केलेल्या दाव्यामुळे त्याला नेमकं कोणी पळवलं, यामागे कोण राजकीय नेता आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र यामागे कोणाकोणाचा हात आहे ते सर्व सांगेन असा दावा ललित पाटीलने केला आहे.

संबंधित बातम्या :

ललित पाटील हा श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान वैद्यकीय तपासणीसाठी मुंबई पोलीस ड्रग माफिया याला घेऊन जात असताना मी ससूनमधून पळून गेलो नाही तर मला पळवलं गेलं आहे अशी माहिती पोलीसांच्या गाडीत बसण्याअगोदर त्याने दिली. मी लवकरच मीडियाशी बोलणार आहे . मला पळवण्यामागे कोणा-कोणाचा हात आहे, हे लवकरच सांगेन प्रतिक्रिया अशी ललित पाटीलने दिली आहे .

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news