Drishyam 2 collection : ‘दृश्यम २’ चा दहाव्‍या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाका, जाणून घ्‍या कमाई…

Drishyam 2 collection :  ‘दृश्यम २’ चा दहाव्‍या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाका, जाणून घ्‍या कमाई…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजय देवगणचा 'दृश्यम 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हा सिनेमा १८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. १० दिवसानंतरही या चित्रपटाला रसिकांची पसंती मिळत आहे.  (Drishyam 2 collection)

 प्रदर्शित झाल्‍यानंतर तिसऱ्या दिवशीच चित्रपटाने बजेटपेक्षा जास्त कमाई केली होती. आता ही कमाई १५० कोटींची जवळ पोहचली आहे.  आज दहाव्या दिवशी या सिनेमाने किती कमाई केली याचे आकडे समोर आले आहेत. अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शित केलेल्या 'दृश्यम २' ने पहिल्याच दिवशी १५.३८ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी २१.५९ कोटींची कमाई केली. दृश्यम  रविवारच्या सुट्टीचा चांगलाच फायदा झालेला पहायला मिळाला.

Drishyam 2 collection : १५० कोटींचा आकडा पार करणार ?

तिसऱ्या दिवशी या सिनेमाने २७.१७ कोटींची टप्पा पार केला. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या दिवशी सिनेमा क्रमश: १०.४८, ९.५ आणि ८.६२ कोटींची कमाई केली. नवव्या आणि दहाव्या दिवशीही दृश्यम २ चा बॉक्स ऑफिसवर धमाका सुरूच आहे. आजच्या दुसऱ्या रविवारीही प्रेक्षकांनी सिनेमाला तुफान प्रतिसाद दिला आहे. आता पर्यंत अजयच्या दृश्यम २ ने १४४.५८ कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा १५० कोटींचा आकडा पार करेल, असे मानले जात आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news