विनापरवानगी पाणी प्यायला; शिक्षकाने त्याचा दात पाडला

विनापरवानगी पाणी प्यायला; शिक्षकाने त्याचा दात पाडला

भोपाळ : परवानगीविना पाणी प्यायला म्हणून एका शिक्षकाने नववीत शिकणाऱ्या मुलाला जबर मारहाण केली आणि यात त्या मुलाचा दात पडल्याची संतापजनक घटना मध्य प्रदेशातील देवास येथे घडली आहे. पीटर असे या शिक्षकाचे नाव आहे.

जखमी विद्यार्थ्याच्या पालकांनी याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी संबंधित अधिकाऱ्याला म्हणाले की, या प्रकरणाचा तत्काळ तपास करण्यात यावा. जिथे हा प्रकार घडला ते होली ट्रिनिटी स्कूल सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विजय नगर येथे आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news