अफगाणिस्तानात भीषण थंडीचे १५७ बळी | पुढारी

अफगाणिस्तानात भीषण थंडीचे १५७ बळी

काबूल : अफगाणिस्तानात १५ दिवसांच्या आत भयंकर थंडीमुळे १५७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७७ हजार जनावरे मृत झाली आहेत. देशातील तापमान उणे २८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकारी संघटनेच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानातील सुमारे २ कोटी ८३ लाख लोक म्हणजेत दोन तृतीयांश लोकांना जिवंत राहण्यासाठी तत्काळ मदतीची गरज आहे.. कडाक्याच्या थंडीमुळे ११ जानेवारी ते १९ जानेवारी या काळात ७८ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यापूर्वीच्या आठवड्यापेक्षा हा आकडा दुप्पट आहे. अफगाणिस्तानात गेल्या १५ वर्षांत इतकी भीषण थंडी कधीच पडली नव्हती. हिमवादळामुळे देशातील स्थिती खूपच गंभीर बनली आहे.

Back to top button