Child Behaviour: मुलांच्या वर्तनातील ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष नको; पालकांनो वेळीच लक्ष द्या

Child Behaviour
Child Behaviour
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: काही मुले कधीकधी विचित्र वागतात हे सामान्य आहे; पण जर तुमचे मुल एखादी विचित्र गोष्ट, कृती वारंवार वेगळ्याप्रकारे अधिक काळापासून करत असेल तर पालकांनी याची गंभीर दखल घेणे आवश्‍यक ठरते. मुलांच्या वर्तनात एखादी वारंवार येणारी चुकीची कृती किंवा त्याची बदलेली वागणूक यामुळे भविष्यात त्याला गंभीर समस्‍यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पालकांनी वेळीच आपल्या मुलांच्या वर्तवणूकीबाबत दक्ष (Child Behaviour) राहणे गरजेचे आहे.  चला चर पाहूया मुलांच्या वर्तनातील अशा कोणत्या चुका आहेत ज्याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये याविषयी…

Child Behaviour : वारंवार त्रागा करणे

जेव्हा मुले (Child Behaviour) रागात असतात, निराश होतात किंवा त्यांना पाहिजे असलेली एखादी गोष्ट मिळत नसेल तेव्हा ते वारंवार त्रागा करताना दिसतात. ही समस्या बालकांमध्‍ये मोठ्या प्रमाणात आढळते. मुले वयाच्या काही वर्षात या प्रकारच्या वर्तनातून बाहेर पडतात; पण तुमचे मुल बालवयानंतरही असे वागत असल्यास, हे गंभीर असू शकते. ही समस्या अधिक काळ राहिल्यास मुलांमध्ये भावनिक समस्या निर्माण झाल्‍याचे हे संकेत असतात.

सतत खोटे बोलणे

सर्व मुले अधूनमधून खोटे बोलतात, असा पालकांचा अनुभव असतो; पण अनेक मुले वारंवार खोटे बोलतात. पालक आपल्या लाडाखातर मुलांच्‍या या वर्तनाकडे दुर्लक्ष करताना आढळतात. मात्र वेळीच मुलांना ही चूक लक्षात आणून दिली नाही तर खोटे बोलण्‍याची सवयच लागते. पालकांनी मुले बोलताना ते अडखळत बोलत नाहीत ना?, ते आपल्यापासून काही लपवत नाहीत ना? याचे निरीक्षण करावे. जर तुमचे मुल सतत खोटे बोलत असतील तर याकडे दुर्लक्ष करु नका.

निरूत्साहीपणा दाखवणे

तुमच्या मुलांना आवड असलेल्या गोष्टी, कृतींमध्ये अचानकपणे कोणत्याही कारणांशिवाय निरूत्साहीपणा दाखवणे. ही अचानक निर्माण झालेली समस्या ही गंभीर असू शकतो. यावरून मुले काहीतरी विचार करत आहेत हे स्‍पष्‍ट होते. ते सध्या आनंदी नसल्याचे यावरून दिसून येत. म्हणून पालकांनी मुलांच्यात झालेला हा बदलाकडे दुर्लक्ष करू नये.या समस्‍येबाबत वेळीच  तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Child Behaviour : आक्रमक होणे

राग, निराशा किंवा लक्ष वेधण्याचा प्रयत्न यासारख्या विविध कारणांमुळे मुले आक्रमक होऊ शकतात. तुमचे मूल आक्रमकतेची चिन्हे दाखवत असेल, तर त्याला समजून घेतले पाहिजे. पालकांना मुलांच्या आक्रमक होण्याच्या समस्येवर त्यांना हे समजण्यास मदत करणे महत्त्वाचे आहे की, रागामुळे फक्त गोष्टी बिघडतात. रागाने स्वत:वरच ताण निर्माण होऊस मानसिकताही बिघडते हे पालकांनी समजून सांगितले पाहिजे.

चिंताग्रस्त असणे

मुलांच्या मनात असणारी भीती आणि काळजीने ही समस्या निर्माण होते. ही समस्या एकदा निर्माण झाल्यास ती दीर्घकाळ टिकू शकते आणि मुलांच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आणू शकते. यामुळे तुमची मुले भ्यासात आणि त्यांच्या विकासात कमी पडू शकतात. त्यामुळे तुमच्या मुलांच्या वर्तनात देखील अशी समस्या जाणवल्यास पालकांनी मुलांशी मोकळा संवाद साधावा.

शाळेतील खराब कामगिरी

मुलं दुसऱ्या एखाद्या, शाळेबाहेरील कृतीत गुंग झाल्यास त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. त्याचा शाळेतील कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या कृतींवर तो शाळेत जाऊन काय काय करतो. यावर दररोज संवाद साधणे आवश्यक आहे. शाळेतील आभ्यासात अनियमितता असणे. अभ्यासात टाळाटाळ करणे, निरूत्साहीपणा दाखवणे हे मुलांच्या शाळेतील खराब कामगिरीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे शाळेतील शिक्षकांकडून मुलांच्या बाबतील येणाऱ्या सूचनांकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news