मला माय लॉर्ड म्‍हणू नका : ओडिशाच्‍या मुख्‍य न्‍यायमूर्तींचे वकिलांना सूचना

मला माय लॉर्ड म्‍हणू नका : ओडिशाच्‍या मुख्‍य न्‍यायमूर्तींचे वकिलांना सूचना

कटक;  पुढारी ऑनलाईन : मला 'माय लॉर्ड' किंवा 'यु आर लॉर्डशिप' असे मला म्‍हणू नका, अशी सूचना ओडिशा उच्‍च न्‍यायालयाचे मुख्‍य न्‍यायाधीश न्‍यायमूर्ती एस. मुरलीधर यांनी वकिलांना केली आहे. मला 'माय लॉर्ड' म्‍हणून संबोधित करण्‍याऐवजी न्‍यायालयाच्‍या मर्यादांचे पालन होईल असा 'सर' किंवा तत्‍सम शब्‍दांचा वापर करा, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. न्‍यायमूर्ती मुरलीधर यांनी केलेल्‍या सूचनेचे राज्‍यातील वकिलांकडून कौतुक केले जात आहेत. सोमवारी मुख्‍य न्‍यायमूर्ती एस. मुरलीधर यांनी वकिलांसाठी एक लेखी सूचना केली. यामध्‍ये म्‍हटलं आहे की, सर्व वकील आणि पक्षकारांना मला एक सूचना करायची आहे. यापुढे तुम्‍ही मला 'माय लॉर्ड', 'यु आर लॉर्डशिप' असे संबोधित करु नका. न्‍यायालयाच्‍या मर्यादांचे पालन होईल असा सर किंवा तत्‍सम शब्‍दाचा वापर करा.

सर म्‍हणून संबोधित करणे तेवढाच सन्‍मानजनक

मुख्‍य न्‍यायामूर्ती एस. मुरलीधर यांनी केलेली सूचनेचे सर्वांना पालन करावे, असे आवाहन ओडिशा उच्‍च न्‍यायालयाच्‍या बार असोसिएशनचे सचिव जे. के. लंका यांनी केले आहे. त्‍यांनी केलेली सूचना योग्‍यच आहे. याचे पालन वकील आणि पक्षकारांनी करावे. कारण न्‍यायमूर्तींना सर म्‍हणून संबोधित करणे तेवढेच सन्‍मानजनक आहे, असेही लंका यांनी नमूद केले.

१९७०मध्‍ये झाला होता आदेश

ओडिशा उच्‍च न्‍यायालयातील न्‍यायमूर्तींनी 'सर' असे संबोधित करावे, असा आदेश तत्‍कालीन मुख्‍य न्‍यायमूर्ती गतिकृष्‍णा मिश्रा यांनी १९७०मध्‍येच जारी केला होता. आता पुन्‍हा एकदा उच्‍च न्‍यायालयाचे मुख्‍य न्‍यायाधीश न्‍यायमूर्ती एस. मुरलीधर यांनी ही सूचना केली आहे. याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन ज्‍येष्‍ठ वकील बुधदेव रौत्रे यांनी केले आहे.

'माय लॉर्ड, युवर ऑनर म्‍हणणे गुलामगिरीचे लक्षण'

न्यायाधीशांना 'माय लॉर्ड', 'युवर ऑनर', 'यु आर लॉर्डशिप' संबोधण्‍याची आवश्‍यकता नाही, असे काही वर्षांपूर्वी सर्वोच्‍च
न्‍यायालयाच्‍या एच. एल. दत्तू आणि न्‍या. एस. ए. बोबडे यांच्‍या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले होते. या शब्‍दांसंदर्भात दाखल केलेल्‍या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने म्‍हटलं होते की, न्यायाधीशांना 'माय लॉर्ड', 'युवर ऑनर', 'यु आर लॉर्डशिप' संबोधणे हे एक गुलामगिरीचे लक्षण आहे. तुम्‍ही न्‍यायाधीशांना आदरयुक्‍त भाषेत संबोधित करु शकता, न्‍यायाधीशांचा उल्‍लेख आदरयुक्‍त शब्‍दात करणे अपेक्षित असल्‍याचे यावेळी खंडपीठाने स्‍पष्‍ट केले होते.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news