अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प. ( संग्रहित छायाचित्र.)
अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प. ( संग्रहित छायाचित्र.)

डोनाल्ड ट्रम्प ठरले अमेरिकेतील सर्वात प्रभावहीन राष्‍ट्राध्‍यक्ष : नव्‍या सर्वेक्षणातील दावा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि वादग्रस्‍तता याचे नाते जुनेच आहे. अमेरिकेतील प्रख्‍यात उद्‍योगपती ते राष्‍ट्राध्‍यक्ष असा त्‍यांचा प्रवास आहे. त्‍याचबरोबर अनेक वादग्रस्‍त प्रसंगांमुळेही ते नेहमी चर्चेतही असतात. आता अमेरिकेच्‍या अध्‍यक्षपदाची निवडणूक काही महिन्‍यांवर आली असताना त्‍यांचे नाव पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहे. कारण नव्‍या सर्वेक्षणात डोनाल्ड ट्रम्प हे देशातील सर्वात प्रभावहीन राष्‍ट्राध्‍यक्ष असल्‍याचा दावा करण्‍यात आला आहे. आजवर अमेरिकेने ४५ राष्‍ट्राध्‍यक्षांची कारकीर्द अनुभवली आहे. यामध्‍ये ट्रम्‍प हे शेवटच्‍या स्‍थानावर आहेत. तर अमेरिकेचे आताचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन हे १४ व्‍या क्रमाकांवर आहेत. ( Donald Trump worst president ever )

असे झाले सर्वेक्षण…

जस्टिन वॉन आणि ब्रँडन रोटिंगहॉस या अमेरिकेनील राजकीय अभ्‍यासकांनी एक सर्वसमावेशक सर्वेक्षण केले. यामध्‍ये १५४ प्रामुख्याने अमेरिकन पॉलिटिकल सायन्स असोसिएशन जोडल्‍या गेल्‍या. त्यांना अमेरिकेचे पहिले राष्‍ट्राध्‍यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्‍यापासून सध्‍याचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन यांच्‍या कार्याच्‍या मूल्यमापन केले. अमेरिकेच्‍या राष्‍ट्रांध्‍यक्षांनी केलेले महत्त्‍वपूर्ण कार्य व त्‍यांनी घेतलेल्‍या महत्त्‍वपूर्ण निर्णयाचा देशावर पडलेला प्रभावाचा अभ्‍यास हे या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट होते. प्रत्येक राष्ट्रपतीला त्याच्या महानतेसाठी 0 ते 100 पर्यंत गुण होते. 0 गुण म्हणजे अयशस्वी, 50 गुण म्हणजे सामान्य आणि 100 गुणांचा अर्थ उत्तम, अशी या गुणांची वर्गवारी होती. या सर्वेक्षणात प्रत्येक राष्ट्रपतीसाठी सरासरी गुण नोंदविण्‍यात आले. त्‍यानुसार सर्वात प्रभावी राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या यादती प्रथम ते शेवटचे स्थान निश्‍चित केले गेले. यंदाच्या सर्वेक्षणात अव्वल स्थानावर कोणताही विशेष बदल झालेला नाही. या यादीतील एकमेव मोठा बदल म्हणजे ट्रम्प. डोनाल्‍ड ट्रम्‍प हे तळाला राहिले असून ते देशाचे सर्वात प्रभावहिन राष्‍ट्राध्‍यक्ष असल्‍याचे या सर्वेक्षणात नमूद करण्‍यात आले आहे. ( Donald Trump worst president ever )

Donald Trump यांना रोखणे हेच बायडेन यांचे मोठे कार्य

अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या कार्याच्‍या मूल्‍यमापनात डोनाल्‍ड ट्रम्‍प हे गृहयुद्ध थांबवण्यात किंवा त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यात अपयशी ठरल्‍यलाचे नमूद करण्‍यात आले आहे. तसेच जस्टिन वॉन आणि ब्रँडन रोटिंगहॉस यांनी म्‍हटलं आहे की, बायडेन यांची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी ट्रम्प यांना पुन्‍हा एकदा अध्‍यक्ष होण्‍यापासून रोखले.

अब्राहम लिंकन सर्वात प्रभावशाली राष्‍ट्राध्‍यक्ष

जस्टिन वॉन आणि ब्रँडन रोटिंगहॉस यांनी केलेल्‍या सर्वेक्षणात अमेरिकेचे सर्वात प्रभावशाली राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या यादीत अब्राहम लिंकन पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी देशातील गुलामगिरी नष्ट केली. एवढेच नाही तर गृहयुद्धाच्या काळात त्यांनी देशाचे प्रभावी नेतृत्व केले, असे सर्वेक्षणात नमूद करण्‍यात आले आहे. दुसऱ्या स्थानावर फ्रँकलिन रुझवेल्ट आहेत. त्‍यांनी महामंदी आणि दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे नेतृत्त्‍व केले. तर तिसऱ्या स्थानावर ब्रिटीशांविरोधात लढा उभारुन स्वातंत्र्य मिळवून देणारे देशाचे पहिले राष्‍ट्राध्‍यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन आहेत. ( Donald Trump worst president ever )

बराक ओबामा पोहचले सातव्‍या क्रमांकावर

अमेरिकेचे सर्वोत्‍कृष्‍ट राष्‍ट्राध्‍यक्षांच यादीत टेडी रुझवेल्ट, थॉमस जेफरसन आणि हॅरी ट्रुमन हे अनुक्रमे चौथ्‍या, पाचव्‍या आणि सहाव्‍या स्‍थानावर क्रम लागतो. यापूर्वीच्या यादीत नऊ क्रमांकावर असलेले बराक ओबामा यंदाच्‍या सर्वोक्षणात सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. ( Donald Trump worst president ever )

यापूर्वीही झाले आहेत सर्वेक्षण

यापूर्वी अमेरिकेतील प्रभावशाली राष्‍ट्राध्‍यक्ष कोण यावर सर्वेक्षण झाले आहेत. कोस्टल कॅरोलिना विद्यापीठाचे वॉन आणि ह्यूस्टन विद्यापीठाचे रोटिंगहॉस यांनी १५४ अमेरिकन राज्‍यशास्‍त्र अभ्‍यासक संस्‍थांच्‍या मदतीने हे सर्वेक्षण केले होते. अमेरिकेचे सर्वोत्तम अध्यक्ष कोण हे जाणून घेणे हे या सर्वेक्षणाचा हेतू होता. यामध्ये आजपर्यंत राहिलेल्या सर्व ४५ अध्यक्षांचा समावेश करण्यात आला होता. 2015 आणि 2018 मध्येही असेच सर्वेक्षण करण्यात आले होते.

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news