डोंबिवली : चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर चाकू हल्ला, पलायनाच्या प्रयत्नात असणारा पती जेरबंद

file photo
file photo
Published on
Updated on

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : चारित्र्यावर संशयातून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची  घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण स्कायवॉकवर घडली. गंभीर जखमी झालेल्या पत्‍नीला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हल्ल्यानंतर पलायनाच्या प्रयत्नात असणाऱ्या पती विकास पाटील याला नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी केली.

कल्याण जवळ आंबिवली येथे विकास पाटील आपल्या पत्नीसह राहत होता. शुक्रवारी रात्री कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉक वरून दोघे पती-पत्नी जात होते. विकास पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोंघामध्ये नेहमीच भांडण होत होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता कल्याणच्या स्कायवॉकवर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. विकासने प्रविणावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात प्रविणाच्या मानेवर, गळ्यावर, छातीवर गंभीर दुखापत झाली आहे.

जखमी प्रवीनाला कल्याण मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर पलायनाच्या प्रयत्नात असणाऱ्या पती विकास पाटील याला नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी केली. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news