Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराची इंग्लंडमध्ये धडाकेबाज फलंदाजी, ७३ चेंडूत झळकावले शतक | पुढारी

Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराची इंग्लंडमध्ये धडाकेबाज फलंदाजी, ७३ चेंडूत झळकावले शतक

पुढारी ऑनलाईन डेस्क : 12 ऑगस्ट रोजी वॉरविक्शायरविरुद्धच्या सामन्यात चेतेश्वर पुजाराने 73 चेंडूत शतक झळकावले, तर एका षटकात 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने एकूण 22 धावा केल्या. भारतीय कसोटी संघाची भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा गेल्या काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत आहे. कौंटी क्रिकेटमध्ये धावा केल्यानंतर तो आता रॉयल लंडन वन डे चषकातही त्याने आपला फॉर्म कायम ठेवला आहे.. शुक्रवारी झालेल्या वॉरविक्शायरविरुद्धच्या सामन्यात पुजाराने 73 चेंडूत शतक झळकावले. तर, एका षटकात 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने एकूण 22 धावा केल्या. मात्र, या चमकदार कामगिरीनंतरही त्याचा संघ ससेक्सला पराभवाला सामोरे जावे लागले. रॉयल लंडन वन डे कपमध्ये चेतेश्वर पुजारा ससेक्स संघाचा कर्णधार आहे.(Cheteshwar Pujara)

सामना जिंकल्यानंतर सलामीवीर रॉब येट्सच्या शतकाच्या जोरावर वॉरविक्शायरसंघाने निर्धारित 50 षटकांत 6 गडी गमावून 310 धावा केल्या. रॉबने 111 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 114 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. त्याच्याशिवाय वॉरविक्शायर संघाचा कर्णधार विल रोड्सने 76 तर मायकेल बर्गेसने 58 धावा केल्या.

311 धावांचा पाठलाग करताना ससेक्स संघाची सुरुवात चांगली झाली. हॅरिसन वॉर्डच्या (22) रूपाने संघाला 35 धावांवर पहिला धक्का बसला, तर दुसरी विकेट 112 धावांवर पडली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजाराने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत संघाची धुरा तर सांभाळलीच, शिवाय कठीण परिस्थितीतही शतक झळकावले.

44व्या षटकापर्यंत पुजारा हुशारीने फलंदाजी करत होता. तो 59 चेंडूत 66 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर मैदानावर उपस्थित होता तेव्हा त्याच्या संघाला शेवटच्या 6 षटकात 70 धावा हव्या होत्या. त्यानंतर पुजाराने 45 व्या षटकात 22 धावा केल्या. पुजाराने ओव्हरचा एकही चेंडू डॉट गेला नाही आणि 4,2,4,2,6,4 च्या मदतीने ओव्हरमध्ये मोठी धावसंख्या उभी केली.

गणेश चतुर्थी: भारतीय रेल्वे सोडणार 14 विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

45व्या षटकात 22 धावा झाल्यानंतर पुजाराच्या संघाला 30 चेंडूत 48 धावा हव्या होत्या. पुजाराने 73 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, परंतु संघाला शेवटच्या 12 चेंडूत 20 धावांची गरज असताना 49व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो बाद झाला. पुजारा बाद झाल्यानंतर संघाला सावरता आले नाही आणि ससेक्सला 4 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. पुजाराने 79 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 107 धावांची शानदार खेळी केली.

Back to top button