‘अब लाशें नहीं गिननी’: ओमायक्रॉनच्या भीतीतून डॉक्टरने केली बायको आणि दोन मुलांची हत्या

‘अब लाशें नहीं गिननी’: ओमायक्रॉनच्या भीतीतून डॉक्टरने केली बायको आणि दोन मुलांची हत्या

कानपुर: कोरोनाचे नैराश्य आणि ओमायक्रॉनच्या भीतीमुळे उत्तर प्रदेशातील एका डॉक्टरने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. कानपूरमधील डॉक्टर सुशील कुमारने शुक्रवारी संध्याकाळी पत्नी, मुलगा आणि मुलीची हत्या केली. कुटुंबाला मारल्यानंतर डॉक्टरांनी एक चिठ्ठीही लिहली आहे. कोविडचा नवीन प्रकार ओमायक्रॉनच्या आगमनानंतर, आणखी मृतदेहांची मोजणी केली जाणार नाही.ओमायक्रॉन सर्वांना मारेल. तसेच त्याला कोविड संबंधित डिप्रेशन आहे असे चिठ्ठीत लिहले आहे.

पत्नी, मुलगा आणि मुलीच्या हत्येनंतर भावाला मेसेज

डॉ. सुशील कुमारने शुक्रवारी संध्याकाळी 5.32 वाजता भाऊ सुनीलला शेवटचा मेसेज केला. पोलिसांना कळव, नैराश्यातून मी खून केला आहे, असे लिहिले आहे. मेसेज वाचून सुनीलने घर गाठले. दरवाजा आतून बंद आढळून आला. त्याने दरवाजा तोडला. आत गेल्यावर त्यांना चंद्रप्रभा, शिखर आणि खुशी यांचे मृतदेह आढळून आले. यादरम्यान पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. भाऊ सुनीलच्या म्हणण्यानुसार, डॉ.सुशील काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. हत्येनंतर तो कुठे आहे, हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

यापुढे मृतदेहांची मोजणी केली जाणार नाही

आता मला कोणताही कोविड नको आहे. ओमायक्रॉन आता सर्वांना ठार करेल. यापुढे मृतदेह मोजता येणार नाहीत. माझ्या निष्काळजीपणामुळे मी माझ्या करिअरच्या अशा टप्प्यावर अडकलो आहे, जिथून बाहेर पडणे अशक्य आहे. मला भविष्य नाही. पूर्ण विचार करून कुटुंबाबरोबर मी स्वतःचा नाश करत आहे. याला अन्य कोणी जबाबदार नाही. मला असाध्य आजाराने ग्रासले आहे. भविष्यासाठी काहीही दृष्टीक्षेपात नाही. याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.

डॉ. सुशील कुमार यांनीही करिअरमध्ये अडकल्याबद्दलही चिठ्ठीत लिहले आहे की, मी माझ्या कुटुंबाला संकटात सोडू शकत नाही. मी सर्वांना मुक्तीच्या मार्गावर सोडत आहे. मी एका क्षणात सर्व संकटे दूर करत आहे. माझ्या मागे कोणीही संकटात सापडलेले मला दिसत नाही. माझा आत्मा मला कधीच माफ करणार नाही. असाध्य डोळ्यांच्या आजारामुळे मला असे पाऊल उचलावे लागले आहे. अध्यापन हा माझा व्यवसाय आहे. डोळे नसताना मी काय करू? बाय…

कोविड सर्वांना ठार करेल

घटनास्थळावर 10 पानी नोट सापडली आहे. त्यात लिहिले आहे की, हा कोविड आता सर्वांना मारेल. ओमायक्रॉन कोणालाही सोडणार नाही, यापुढे प्रेतांची गणना केली जाणार नाही. माझ्या निष्काळजीपणामुळे मी करिअरच्या त्या टप्प्यावर अडकलो आहे. जिथून बाहेर पडणे अशक्य आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये त्यांची ड्युटी कोविड हॉस्पिटलमध्ये लावण्यात आली होती. यादरम्यान त्यांनी अनेक लोक मरताना पाहिले.

डॉ. सुशील कुमारने प्रथम पत्नीच्या डोक्यावर जड वस्तूने वार केले . त्यानंतर मुलगा आणि मुलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली, मात्र त्यापूर्वीच ते फरार झाले आहेत. डॉ. सुशील कुमार हे 48 वर्षांच्या पत्नी चंद्रप्रभासोबत कानपूरमधील इंद्रनगरच्या दिव्यता अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांचा मुलगा शिखर सिंग (18) आणि मुलगी खुशी सिंग (16) हे देखील त्याच अपार्टमेंटमध्ये राहत होते. सध्या पोलीस डिप्रेशन व्यतिरिक्त इतर बाजूने या खुनांचा तपस करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news