चांद्रयान-3’ : चंद्र हा एकमेव असा खगोल आहे ज्यावर पृथ्वीशिवाय अन्यत्र मानवाचे पाऊल पडलेले आहे

चांद्रयाण-३
चांद्रयाण-३

भारताच्या 'चांद्रयान- 1' या मोहिमेत चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आहे याबाबतचे महत्त्वाचे संशोधन झाले होते. 'चांद्रयान-2' मोहिमेत लँडरचे सॉफ्ट लँडिंग होऊ शकले नव्हते, तरी ऑर्बिटरने अनेक वर्षे चंद्राभोवती फिरत पृथ्वीच्या या एकमेव नैसर्गिक उपग्रहाची बरीचशी माहिती पुरवली होती. आता भारताचे 'चांद्रयान-3' चंद्राच्या कक्षेत पोहोचलेले आहे. 23 ऑगस्टला यानाचे 'विक्रम' लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. चंद्राच्या या भागात लँडर उतरवणारा जगातील पहिलाच देश ठरण्याची संधी आपल्या देशाला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्राची ही रंजक माहिती… Moon

* चंद्र हा एकमेव असा खगोल आहे ज्यावर पृथ्वीशिवाय अन्यत्र मानवाचे पाऊल पडलेले आहे. Moon
* आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक अंतराळयाने चंद्रावर पाठवण्यात आलेली आहेत.
* चोवीस अंतराळवीरांनी चंद्राची सफर केली असून त्यापैकी बाराजणांनी प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरून तिथे चालण्याचा अनुभव घेतला आहे.
* पृथ्वीवरील प्रयोगांसाठी चंद्रावरून आतापर्यंत 382 किलो माती आणि दगड आणण्यात आले आहेत. Moon
* 450 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी आणि 'थिया' ग्रहाच्या धडकेतून चंद्राची निर्मिती झाली.
* 400 वर्षांपूर्वी गॅलिलिओने टेलिस्कोप बनवला आणि त्यामधून त्याने प्रथम चंद्रालाच पाहिले!
* गॅलिलिओने सांगितले की, पृथ्वी आणि चंद्राची जमीन बहुतांश सारखीच आहे. चंद्रावरही जमीन, डोंगर आणि पठार आहे.
* 'नासा'च्या माहितीनुसार ज्यावेळी चंद्र बनला त्यावेळी त्याचा पृष्ठभाग वितळलेले दगड म्हणजेच मॅग्माने बनलेला होता. लाखो वर्षांमध्ये हा मॅग्मा वाळून कठीण झाला.
* पृथ्वीवरून चंद्र पाहिल्यास तो काही ठिकाणी सफेद, चमकदार दिसतो तर काही ठिकाणी काळा दिसतो. या 15 टक्के काळ्या भागाला 'मारिया' म्हटले जाते जो लाव्हा थंड होऊन बनला. चंद्राच्या चमकदार भागाला 'टेरी' असे म्हणतात.
* चंद्रावर कोळशासारखी धूळ आणि दगड आहेत.
* चंद्रावरील खड्डे हे त्याच्यावर आदळलेल्या खगोलांच्या धडकेने बनलेले आहेत. काही खड्डे तर इतके खोल आहेत की त्यामध्ये 29,032 फूट उंचीचे एव्हरेस्ट शिखर सहज सामावेल!
* चंद्रावरील खडकांमध्ये पाण्याचा अंश असल्याचे पुरावे मिळाले आहेत. Moon
* चंद्रावर वातावरण नसले तरी हेलियमसारखे वायू आहेत. मानवाला तिथे श्वास घेता येत नाही.
* चंद्रावर अत्यंत हलके गुरुत्वाकर्षण आहे जे पृथ्वीच्या तुलनेत 1/6 इतके आहे.
* चंद्र नसता तर पृथ्वी आपल्या जागी स्थिर राहू शकली नसती. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वी आपल्या अक्षावर 23.5 अंशात झुकलेली राहते.
* पृथ्वीवरून चंद्राचा केवळ एक भागच दिसत असतो. Moon
* चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बळामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी होत असते. चंद्राच्या जवळ पृथ्वीचा जो भाग असतो तिथे भरती व विरुद्ध बाजूला ओहोटी येते.
* 1969 ते 1972 या काळात अमेरिकेच्या 'नासा'ने चंद्रावर सहा अपोलो मोहिमा पाठवल्या. 'अपोलो-11' मोहिमेत नील आर्मस्ट्राँगने प्रथमच चंद्रावर पाऊल ठेवले.
* दरवर्षी चंद्र पृथ्वीपासून 3.8 सेंटिमीटर दूर सरकत आहे.Moon
* 1972 नंतर आतापर्यंत गेल्या 50 वर्षांमध्ये एकही माणूस चंद्रावर गेलेला नाही.  Moon

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news