Puducherry : ‘विद्यार्थ्यांना मिळेना गणवेश’; ‘DMK’ आमदार चक्क शाळेच्या गणवेशात विधानसभेत

Puducherry : ‘विद्यार्थ्यांना मिळेना गणवेश’; ‘DMK’ आमदार चक्क शाळेच्या गणवेशात विधानसभेत

पुढारी ऑनलाईन : पंधराव्या पुद्दुचेरी विधानसभेचे तिसरे सत्र आजपासून (दि.०३) सुरू झाले. दरम्यान, पुद्दुचेरी विधानसभा सभागृहात (Puducherry)  विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना अनोखा निषेध पाहायला मिळाला. पुदुच्चेरी येथील 'DMK' पक्षाचे आमदार चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेशात सभागृहात पोहचले. त्याला कारणही तसेच होते. विद्यार्थ्यांना गणवेश, सायकल आणि लॅपटॉप मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी विद्यार्थ्यांचा गणवेश घालून सायकलवरून येत विधानसभेत प्रवेश केला.

सत्ताधारी पक्षाकडून शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, सायकली आणि लॅपटॉप न दिल्याबद्दल सरकारच्या निषेधार्थ द्रमुकचे आमदारांनी अशा अनोख्या पद्धतीने निषेध (Puducherry) केला आहे. द्रमुक आमदारांनी विद्यार्थ्यांसारखा शालेय गणवेश परिधान केला. यामध्ये शर्ट-पँट, पाठीवर दप्तर, गळ्यात ओळखपत्र आणि हे आमदार थेट सायकलवरूनच सभागृहात पोहचले. असा शालेय पोशाख परिधान करतच या आमदारांनी सभागृहात उपस्थित राहत, कामकाजात सहभाग घेतला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news