सोन्याने साठी ओलांडली; प्रति तोळा एक हजार ६७ रुपयांची दरवाढ | पुढारी

सोन्याने साठी ओलांडली; प्रति तोळा एक हजार ६७ रुपयांची दरवाढ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  सोने व चांदी दरात वाढ झाली असून सोने आतापर्यंतच्या सर्वाधिक पातळीवर पोहोचले आहे. एका दिवसात सोन्याच्या दरात दहा ग्रॅममागे एक हजार ६७ रुपयांची वाढ झाली असून चांदीचे दर किलोमागे दोन हजार ४२५ रुपयांनी वाढले आहेत.

गुरुवारी सराफ बाजारात प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ६० हजार १०० तर चांदीचा भाव ७३ हजार ५०० रुपये होता. ग्राहकांना सोने-चांदी खरेदी करताना यामध्ये ३ टक्के जीएसटीचा अधिकचा अधिभार सोसावा लागणार आहे. सोन्या-चांदीच्या दरवाढीमागे, अर्थसंकल्पात सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमाशुल्कात केलेली वाढ आणि अर्थसंकल्पानंतर केंद्रीय बँकांकडून सोन्याची वाढलेली खरेदी ही कारणे प्रामुख्याने असल्याने सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

Back to top button