Deepika Singh : हिला कुणी तरी थांबवा रे! संध्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया (Video)

Deepika Singh,
Deepika Singh,

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्हीची प्रसिद्ध मालिका दीया और बाती हममध्ये संध्या बींदणीच्या भूमिकेत दीपिका सिंह होती. (Deepika Singh ) याच भूमिकेतून ती घराघरात पोहोचली. आता दीपिका सिंहचा लूक पूर्णपणे बदलला आहे. टीव्हीची ही संस्कारी आणि साधी सून आता खूप ग्लॅमरस दिसतेय. त्यांचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती ट्रेंडींग गाणे कावला वर डान्स करताना दिसत आहे. नेहमी दीपिका तिच्या डान्सवरून ट्रोल होते. आताही तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. (Deepika Singh )

दीपिका सिंहने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सध्या ट्रेंड असलेले गाणे 'कावला' वर डान्स व्हिडिओ शेअर केला. जेलर चित्रपटातील हे गाणे खूप पसंतीस पडत आहे. या गाण्यात तमन्ना भाटिया देखील देखील आहे. याच गाण्यावर तमन्नाचे सिग्नेचर स्टेप करत जेव्हा डान्स व्हिडिओ शेअर करण्यात आला. तिचा डान्स पाहून काही नेटकरी त्यांना ट्रोल करू लागले. दीपिका सिंहने व्हिडिओमध्ये ब्लैक शॉर्ट टॉप आणि लूज जीन्स आऊटफिट परिधान केले आहे. या गाण्यावर डान्स करताना पाहिलं जाऊ शकतं की, मोकळ्या केसात दीपिका खूप ग्लॅमरस दिसतेय. परंतु, तिचा हा डान्स काहींना आवडलेला नाही.

एका युजरने व्हिडिओमध्ये कमेंट करून लिहिलंय की, 'हिचा डान्स कुणी तरी बंद करा यार'. अन्य एकाने लिहिलं, 'डान्स तर चांगला करतेस, फक्त पोस्ट करू नका.' तर आणखी एका युजर लिहिलंय, 'मॅम काय गरज आहे, डान्स करण्याची'. आणखी एकाने लिहिलंय, 'इतका खराब डान्स आजपर्यंत पाहिला नाही'.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news