Nawazuddin siddiqui Haddi movie
Nawazuddin siddiqui Haddi movie

Haddi On OTT: नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ चित्रपट ओटीटीवर रिलीज

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर आणि अक्षत अजय शर्मा यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट 'हड्डी' शक्ती आणि बदला रुपात पडद्यावर येत आहे. नवाजुद्दीनने दमदार ॲक्टिंग केली आहे. (Haddi On OTT) या क्राईम ड्रामामध्ये दोन वेगवेगळ्या भूमिका दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. (Haddi On OTT)

जी5 ने मागील सोमवारी घोषणा केली होती. त्यांनी पोस्ट शेअर करून माहिती दिली होती क, Nawazuddin Siddiqui चा चित्रपट जी5 वर रिलीज होईल. चित्रपटाची निर्मिती जी स्टुडिओज, संजय साहा, राधिका नंदा (अनंदिता स्टुडिओज) ची आहे. यामध्ये अनुराग कश्यपचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे.

चित्रपटात ईला अरुण, मोहम्मद जीशान अय्यूब, सौरभ सचदेवा, श्रीधर दुबे, राजेश कुमार, विपिन शर्मा आणि सहर्ष शुक्ला यासारखे कलाकार आहेत. हा चित्रपट हिंदीमध्ये जी5 वर पाहता येईल.

नवाजुद्दीन 'जोगीरा सारा रा रा' आणि 'टीकू वेड्स शेरू' मध्ये दिसला होता. हे दोन्ही चित्रपट काही खास कमाल नाही दाखवू शकली. तो तेलुगू मूवी 'Saindhav' मध्येही दिसेल. 'अद्भुत', 'नूरानी चेहरा', 'बोले चूडियां', 'संगीन' यासारखे चित्रपट आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE5 (@zee5)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news