Marathi OTT : रहस्यांनी भरलेले चित्रपट ऑगस्टमध्ये थरकाप उडवणार! | पुढारी

Marathi OTT : रहस्यांनी भरलेले चित्रपट ऑगस्टमध्ये थरकाप उडवणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑगस्टमध्ये “अल्ट्रा झकास” मराठी ओटीटी, भय आणि थरार यांचा बार उडवणार आहे. न सोडवलेली खतरनाक रहस्ये आणि गुपितांचा गूढपणे चाललेला काळोखातला भयावह शोध. अनपेक्षित आणि वळणावळणावर थक्क करणारं कथानक असलेले ‘चुझल’ (भयानक रात्र) आणि ‘टेररडॅकटाइल’ (मृत्यूचा तांडव) आणि ‘द ब्लॅकआउट एक्सपेरीमेंट’ (काळोखी रात्र) हे मराठी डब चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Marathi OTT movie
Marathi OTT movie

‘चुझल’ या आत्मा आणि गडद रहस्यांनी भरलेल्या चित्रपटाची कथा एका प्राचीन हवेलीच्या सभोवताली असणाऱ्या गूढ घटनांच्या भोवती फिरते.

‘टेररडॅकटाइल’ची कथा एका ओसाड जंगलात अनपेक्षित घटनांभोवती फिरत उलगडत जाते. तर ‘द ब्लॅकआउट एक्सपेरीमेंट’ मध्ये अनोळखी लोकांचा समूह एका गूढ, अंधारलेल्या आश्रयस्थानातून सुटण्यासाठी प्राणघातक आव्हानांना सामोरे जातात.

३ ऑगस्टला ‘टेररडॅकटाइल’ (मृत्यूचा तांडव) हा आंतरराष्ट्रीय चित्रपट आपल्या मराठी भाषेत ‘अल्ट्रा झकास’वर प्रदर्शित करण्यात आला. या रहस्यप्रधान चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून १७ ऑगस्ट ‘द ब्लॅकआउट एक्सपेरीमेंट’ (काळोखी रात्र) आणि २१ ऑगस्टला ‘चुझल’ (भयानक रात्र) भेटीला येणार आहेत.

Back to top button