पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील एका राज्याने तेथील भारतीयांच्या सांस्कृतिक भावना लक्षात घेता मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्याने हिंदूचा दिवाळी हा सण अधिकृत सुट्टी म्हणून घोषित केला आहे. अशी माहिती अमेरिका सिनेटचे सदस्य निकिल सावळ यांनी त्यांच्या ट्विटरवरून बुधवारी (दि.२६) दिली. या निर्णयासाठी सिनेटर निकिल सावळ (Diwali in USA) यांनी सिनेटच्या सर्व सदस्यांचे आभार मानले आहेत.
अमेरिकेतील २ लाख लोकांना पेनसिल्व्हेनिया राज्यात दिवाळी हा हिंदूंचा सण साजरा करता यावा आणि या दिवशी अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात यावी; असे विधेयक सादर करण्यात आले होते. या विधेयकाला सर्व सिनेट सदस्यांनी एकमताने मतदान करत मंजूरी दिली. त्यामुळे इथून पुढे अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यात हिंदूंच्या 'दिवाळी सणाला 'अधिकृत सुट्टी' (Diwali in USA) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
पेनसिल्व्हेनियामधील (Diwali in USA) रहिवाश्यांसाठी लढणाऱ्या सिनेट सदस्य निकिल सावळ यांनी ट्विट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दिवाळी सणाला अधिकृतपणे सुट्टी मिळवण्यासाठी सिनिटने एकमताने मतदान केले. दिवाळी हा दिव्यांचा आणि कनेक्शनचा सण आहे. तुम्ही पाहिले आहे, तुमचे सर्वांचे स्वागत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच सिनेट सदस्य ग्रेग रॉथमन यांचे देखील निकिल सावळ यांनी या विधेयक सादर केल्यासंदर्भात आभार मानले आहे.