पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार व्हावे. तसेच जगाने महाराष्ट्राच्या गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया असा निर्धार व्यक्त करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या आहेत. यासर्भातील शुभेच्छांचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या अधिकृत 'X' सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Diwali 2023)
या व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले पुढे म्हटले आहे की, दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पुर्ण व्हावेत अशी मनोकामना, देखील व्यक्त केली आहे. (Diwali 2023)
राज्यात दिवाळी सणाला प्रारंभ झाला असून, सगळीकडे सणाची धामधुम सुरू आहे. या निमित्त सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (दि.१०) तिरूमला येथे सहकुटुंब तिरूपती बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कुटुंबातील सदस्यांसोबत बालाजीचे भक्तीभावाने दर्शन घेत, अभिषेक घातला. अशी माहिती स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत 'X' सोशल मीडीया अकाऊंटवरून दिली होती. (CM Eknath Shinde)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल(दि.१०) तिरूपती बालाजी चरणी नतमस्तक झाले. यावेळी शिंदे यांनी राज्यातील जनतेला सुखी समाधानी, ठेवण्याचे साकडे बालाजीकडे मागितले. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबातील पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे तसेच नातू रुद्रांश सदस्य होते. तसेच तिरुपती देवस्थानाचे अध्यक्ष भुमना करुणाकर रेड्डी देखील यावेळी उपस्थित होते. (CM Eknath Shinde)