Disha Patani : टायगरच्या ब्रेकअपनंतर दिशानं ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, हाॅट अवतार पाहून चाहते थक्क

Disha Patani
Disha Patani
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ( Disha Patani) नेहमी सोशल मीडियावर आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. सध्या दिशाच्या आणखी एका ब्लॅक रंगाच्या रिविलिंग ड्रेसने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. या तिच्या फोटोंचे कोतुक करताना चाहत्यांनी 'Stunnnnnning!!?', 'Awmsm❤️', 'Omg?', 'Woow', 'So beautiful looking ❣️', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याच दरम्यान दिशाचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफने त्याच्या ब्रेकअपबद्दलचा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी ( Disha Patani) दोघेजण अनेकवेळा पार्टीत तर काही वेळा एकत्रित सुट्ट्यांचा आनंद घेताना स्पॉट झाले आहेत. तर दिशाची चांगली ओळखदेखील टायगरच्या कुटुंबाशी आहे. यामुळे चाहत्यांनी दोघेजण एकमेकांना डेट करत असताना त्याच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चांना उधान आलं होतं. याच दरम्यान टायगर श्रॉफ दिग्दर्शक करण जोहरच्या प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विथ करण' च्या ९व्या पर्वात पोहोचला. यावेळी त्याने त्याच्या रिलेशनशिफबद्दल खुलासा केला. दिशा एक चांगली मैत्रीण असून मी अजून सिंगल असल्याचे त्याने म्हटले आहे. यानंतर त्याच्यामधील ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर पसरल्या. याच दरम्यान दिशाने बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडत फोटोशूट केले आहे.

दिशा पटानीने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या रिविलिंग ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात दिशा फिट ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. मोकळे केस, लिपस्टिक आणि मेकअपने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे. दिशाने खास करून हे फोटोशूट फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२२ मध्ये परफॉर्मवेळी केले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने '#filmfare' असा हॅशटॅग दिला आहे. दिशाचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांची तिचे भरभरून कौतुक करताना 'ब्लॅक रंग तिच्या उठून दिसतोय' म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी 'Stunnnnnning!!?', 'Awmsm❤️', 'Omg?', 'So beautiful looking ❣️', 'Amazing look ?', 'Stylish?', 'you are looking beautiful ??', 'Gorgeous, Wow❤️', 'Nice ?', 'maam Still and only Bollywood crush', 'Yun khili khili ??yun sawar sawar ayee Jane jigar tum chali kha ?❤️?', 'काय विचार करून टायगरने नकार दिलाय? ?', यासारख्या अने कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यंत १५ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. यासोबत दिशा पाटानीचे सोशल मीडियावर अनेक हॉट फोटो आणि मिरर सेल्फी पाहायला मिळतात. यात दिशा खूप वेळा ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय. दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आगामी ​​'योधा' चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news