One Word Tweet : फक्त एकाच शब्दाचं ट्विट! सचिन ते बायडनपर्यंत अनेकजण ट्रेंडमध्ये सहभागी ; जाणून घ्या या हटके ट्रेंडबद्दल | पुढारी

One Word Tweet : फक्त एकाच शब्दाचं ट्विट! सचिन ते बायडनपर्यंत अनेकजण ट्रेंडमध्ये सहभागी ; जाणून घ्या या हटके ट्रेंडबद्दल

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड येईल हे सांगता येणार नाही. गेल्या काही तासांमध्ये सोशल मीडिया नेटवर्किंग वेबसाईट असलेल्या ट्विटरवर (Twitter) एक ट्रेंड सुरू आहे. फक्त एकच शब्द ट्विट (One Word Tweet ) करायचा ट्रेंड सुरु आहे. या ट्रेंडमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) पासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर ही सामिल झाला आहे. जाणून घेऊया हा ट्रेंड कोणी आणि का सुरु केला.

“फक्त एकच शब्द” 

फक्त एकच शब्द असलेले ट्विट, असा ट्विटरवर ट्रेंड सुरु आहे. सोशल मीडिया नेटवर्किंग वेबसाईट असलेल्या ट्विटरची (Twitter) कमी शब्दात व्यक्त होण्यासाठी खासियत आहे. गेल्या काही तासांमध्ये हा वन वर्ड ट्विट हा ट्रेंड खूप वेगाने सुरु आहे. सोशल मीडियावर या ट्रेंडची चर्चा सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) पासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर ही या ट्रेंडमध्ये सहभागी झाले आहेत. त्याच बरोबर अनेक व्यावसायिक, सामाजिक संघटनाही या ट्रेंडचा भाग झाल्या आहेत. पण ट्विटर युझर्सच्या लक्षात येत नाही आहे की, हा ट्रेंड का सुरु आहे आणि कोणी केला आहे. 

One Word Tweet : कशी झाली सुरुवात 

काही लोकांच्या मते अमेरिकन ट्रेन सेवा (Amtrak) नावाच्या अधिकृत ट्विटर हँडलने एक ट्विट शेअर केल्यावर याची सुरुवात झाली. हे ट्विट 2 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12.30 च्या सुमारस केले होते. ज्यामध्ये फक्त एक शब्द ‘ट्रेन’ (trains) ट्विट करण्यात आला होता.

या ट्विटनंतर काहीच तासात “फक्त एकच शब्द” (One word Tweet) या ट्विटची संख्या वाढली. या ट्रेंडमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी यात सहभाग घेतला. ‘ट्रेन’ (trains) या “फक्त एकच शब्द” असलेल्या ट्विटचे 27,000 हजार रीट्विट झाले आहेत. 

One Word Tweet मध्ये हे लोक झाले आहेत सामिल

  • “फक्त एकच शब्द” (One Word Tweet) मध्ये अमेरिकन संस्था नासा (NASA) सुद्धा सहभागी झाली आहे. नासाने ‘Universe’ हा शब्द ट्विट केला आहे.
  • क्रिकेट जगतात मास्टर ब्लास्टर अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरने ‘cricket’ (‘क्रिकेट’) हा शब्द ट्विट केला आहे.
  • मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी  ‘Democracy’ हा शब्द ट्विट केला आहे.
  • स्टारबक्सने  ‘Coffee’ हा शब्द ट्विट केला आहे.
  • क्रिकेटर दिनेश कार्तिकने पत्नीच नाव ‘Dipika’ ट्विट केले आहे तर त्याच्या पत्नीने Kartik हा ट्विट केला आहे.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC – International Cricket Council)  cricket (‘क्रिकेट’) हा शब्द ट्विट केला आहे.

याचबरोबर गुगल मॅप, WWE  (World Wrestling Entertainment), श्रीकांत तिवारी या ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button