Digi Kavach | आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी ‘डिजी कवच’, जाणून घ्या त्याविषयी

Digi Kavach | आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी ‘डिजी कवच’, जाणून घ्या त्याविषयी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुगलने नवी दिल्ली येथे गुगल फॉर इंडिया २०२३ इव्हेंटच्या नवव्या आवृत्तीत गुरुवारी (दि.१९) मोठी घोषणा केली. गुगलने  भारतातील आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी 'डिजी कवच' या उपक्रमाची घोषणा केली आहे. गुगलने म्हटलं आहे की," लोकांची आर्थिक घोटाळे आणि फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी आमचे प्रयत्न वाढवत आहोत. 'डिजी कवच' उपक्रमाअंतर्गत आर्थिक घोटोळे आणि फुसवणूक रोखली जाणार आहे. जाणून घ्य़ा काय आहे 'डिजी कवच'. (Digi Kavach)

 Digi Kavach : काय आहे 'डिजी कवच'

आजच्या डिजिटल युगात आर्थिक फसवणुकीचा प्रसार हा एक गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. ऑनलाइन बँकिंग, डिजिटल व्यवहार आणि आर्थिक तंत्रज्ञान (फिनटेक) च्या प्रसारामुळे, घोटाळेबाज आणि फसवणूक करणारे नवीन मार्ग शोधत असतात. या वाढत्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी, गुगलने आपला 'डिजी कवच' उपक्रम सुरू केला आहे. 'डिजी कवच' हे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याआधी आर्थिक फसवणुकीचे स्वरुप ओळखण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या अंतर्गत, 'डिजी कवच' टीम प्रथम घोटाळेबाजांच्या पद्धती आणि कार्यपद्धतीचा अभ्यास करतील आणि धोके लवकर शोधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरते.  त्यानंतर त्याचा पाठपुरावा करुन संभाव्य आर्थिक नुकसान टळू शकते. या उपक्रमासाठी, माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया-मुख्यालय असलेली टेक फर्म फिनटेक असोसिएशन फॉर कन्झ्युमर एम्पॉवरमेंट (FACE) सह सहकार्य करत आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news