तांत्रिक बिघाडामुळे दिब्रुगडहून जाणारे इंडिगो विमान गुवाहाटीकडे वळवले! सर्व प्रवासी सुखरुप

तांत्रिक बिघाडामुळे दिब्रुगडहून जाणारे इंडिगो विमान गुवाहाटीकडे वळवले! सर्व प्रवासी सुखरुप

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तांत्रिक बिघाडामुळे दिब्रुगडहून जाणारे इंडिगोचे विमान आज ( दि.४ ) गुवाहाटीच्या बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली आणि भाजपचे दोन आमदार प्रशांत फुकन आणि तेराश गोवाला यांच्यासह 150 हून अधिक प्रवासी विमानात प्रवास करत होते. यावेळी पायलटने विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घोषणा केली. यानंतर विमान गुवाहाटीच्या लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले,

विमानातील सर्व प्रवासी सुखरूप

रामेश्वर तेली यांनी दिलेल्‍या माहितीनसार, " भाजप आमदार प्रशांत फुकन आणि तेराश गोवाला यांच्यासोबत मी इंडिगो विमानातून प्रवास करत होतो., गुवाहाटी येथील दिब्रुगढ विमानतळाकडे वळवण्यापूर्वी हे विमान 15 ते 20 मिनिटे हवेत होते. आम्ही सर्व सुरक्षित आहोत."

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news