पुढारी ऑनलाइन डेस्क : Odisha Accident Railway Board Press Conference : ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात अडकलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी आमचा हेल्पलाइन क्रमांक १३९ यावर संपर्क साधावा. हा कॉल सेंटर नंबर नाही, आमचे वरिष्ठ अधिकारी कॉलला उत्तर देत आहेत आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. जखमी किंवा मृतांचे कुटुंबीय आम्हाला कॉल करू शकतात आणि आम्ही त्यांना भेटू शकतील याची खात्री करू. त्यांचा प्रवास आणि इतर खर्च आम्ही करू, अशी माहिती जया वर्मा सिन्हा, संचालन आणि व्यवसाय विकास सदस्य, रेल्वे बोर्ड यांनी दिली आहे.
जया वर्मा सिन्हा, संचालन आणि व्यवसाय विकास सदस्य, रेल्वे बोर्ड, यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी ओडिशा रेल्वे अपघाता संदर्भात महत्वाच्या मुद्द्यांवर आज रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर माहिती दिली. अपघात कसा झाला याचे कारण काय, इंटरलॉकिंग सिस्टिम, कवच सिस्टिम, अपघातग्रस्तांना मदत, अशी एकूण सर्व माहिती यावेळी दिली.
अपघातात ज्यांचे नातेवाईक, मित्र-मैत्रिण अडकले आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी १३९ क्रमांकावर संपर्क साधावा. हा कॉल सेंटर नंबर नसून तिथे थेट अधिकारी तुम्हाला असिस्ट करत आहेत. तसेच त्यांना आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवास खर्च, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था अशा सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
ओडिशातील रेल्वे अपघातानंतर जया वर्मा आणि अन्य सदस्यांची पत्रकार परिषद सुरू आहे. यावेळी जया वर्मा यांनी अपघातातील जखमी तसेच मृतांच्या नातेवाईकांना आतापर्यंत 3.5 कोटी रुपयांची मदत हस्तांतरित केली आहे. यामध्ये 285 मृतांच्या नातेवाईकांना 3.2 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहे. तर अन्य रकम जखमींना देण्यात आली आहे. यामध्ये किरकोळ जखमींना ५०,००० रुपये तर गंभीर जखमींना २००,००० रुपयांची मदत देण्यात आली आहे.
अपघाताच्या प्राथमिक कारणांमध्ये सिग्नलमध्ये बिघाड असल्याचा अंदाज आहे. मात्र, याविषयी अधिकृतपणे खात्रीशीर सांगता येत नाही. कारण अजूनही कारणांचा शोध घेणे, मिळालेल्या माहितीचा अभ्यास करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस) याचा अभ्यास करत आहेत. ते रिपोर्ट सबमिट करतील तेव्हाच अधिकृतपणे सांगता येईल.
याशिवाय कवच, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिमबद्दल त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. 'कवच' ही उत्तम सिस्टिम आहे. या अपघातात 'कवच' प्रणाली का उपयोगी पडली नाही, याबाबत त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली.