धुळे : परतीच्या पावसासाठी शिवसेनेकडून आई एकविरेची सामूहिक आरती

धुळे : परतीच्या पावसासाठी शिवसेनेकडून आई एकविरेची सामूहिक आरती

धुळे : पुढारी वृत्तसेवा,  शहरातील एकविरा मातेच्या मंदिरात व विविध धार्मिक स्थळांवर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पाणी संकट टाळण्यासाठी देवाला साकडे घातले. यावेळी धुळे महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कामामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याचा आरोप करीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

संबधित बातम्या :

यंदा धुळे जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणीबाणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेने आज विविध मंदिरात जाऊन देवाला पाणी संकट टाळण्यासाठी साकडे घातले. पावसाच्या पाण्याअभावी धुळे जिल्ह्यातील शेतकरी तसेच अधिकतम शेती उत्पन्नावर विसंबून असलेल्या धुळे जिल्ह्यातील सर्वच नागरिक संकटात सापडले आहेत. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस योग्य वेळी पाऊस न पडल्याने शेतकऱ्याच्या हातात रब्बी पीक गेले आहे. तसेच आतापर्यंत धुळे जिल्ह्यात आवश्यक तेवढा पाऊस न झाल्याने पाण्याचे जल स्त्रोत तलाव, धरणे व विहिरी इत्यादी वर्षभर जलसाठा पुरेल एवढ्या क्षमतेने अद्याप भरलेले नाहीत. जिल्ह्यात योग्य तो पाऊस न झाल्याने नदी व नाले यंदा वाहिले नसल्याने विहिरींची पाण्याची पातळी पावसाळ्यातच अत्यंत खालावली आहे. तसेच धुळे शहरासह धुळे जिल्ह्यातील अधिकतम भागात हिवाळ्यातच पिण्याच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

ही बिकट परिस्थिती पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या वतीने धुळे जिल्हा सह धुळे शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिरात सामूहिक रित्या आरती करून परतीचा पाऊस चांगला होण्यासाठी प्रार्थना केली. तसेच शिवसैनिकांनी मुस्लिम बांधवांसह धुळे येथील 'अंजन शहा बाबा' यांच्या दरबारी सामूहिक रित्या धुळे जिल्ह्यात परतीचा पाऊस होण्यासाठी प्रार्थना केली. तसेच प्रशासनाकडून नियोजना अभावी पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी मागील अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे. सत्ताधारी भाजप पक्षाच्या खासदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सातत्याने धुळेकर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

जिल्ह्याची पाण्याची बिकट परिस्थिती पाहता यापुढे नियोजन शून्य पद्धतीने काम करणाऱ्या सत्ताधारी तसेच प्रशासनाविरुद्ध शिवसेना यापुढे पाण्यासारख्या गंभीर प्रश्नाला घेऊन शिवसेना स्टाईल मध्ये जबाबदार अधिकाऱ्यास जाब विचारण्यात येईल. असा इशारा देण्यात आला. सदर उपक्रमात संपर्कप्रमुख अशोक धात्रक, सह संपर्कप्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, धीरज पाटील, देविदास लोणारी, भरत मोरे, विधानसभा संघटक ललित माळी आदि शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news