[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
धुळे : पुढारी वृत्तसेवा
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना आणि 300 कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप गंभीर असून देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनेतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे माजी राज्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावे अशी मागणी करीत धुळे शहर व जिल्हा काँग्रेसच्यावतीने आज धुळ्यात निदर्शने केली.
पुलवामा घटनेत केंद्र सरकारची अक्षम्य चूक झाली आहे. त्यामुळे या घटनेत आपले 40 जवान बळी गेले. याबाबत माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी धक्कादायक खुलासा केला. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज धुळ्यात काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकार्यांनी निदर्शनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुलवामा घटनेबाबत गंभीर प्रश्न विचारले. पुलवामा घटनेत केंद्र सरकारची अक्षम्य चूक झाली आहे, वक्तव्यावर मलिक यांना गप्प राहण्यास का सांगितले, भारतीय जवानांना दुसरीकडे पाठविण्यासाठी विमानाची मागणी का नाकारण्यात आली, पुलवामा घटनेत वापरलेले आरडीएक्स कुठून आले, पुलवामा घटना व 40 जवानांचे बलिदान हे भाजपा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी केले होते का, मलिक यांना 300 कोटी रुपयांची ऑफर का दिली, या प्रश्नांचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे अशी मागणी यावेळी केली.
माजी राज्यपाल मलिक यांचे आरोप गंभीर असून देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी या निदर्शनातून केली. यावेळी माजी खा. बापू चौरे, धुळे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, माजी आ.डी.एस.अहिरे, मधुकर रंगराव पाटील, प्रा.जयपाल सिसोदिया, दिपक गवळे, साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, कार्याध्यक्ष दिपक साळुंके, ज्येष्ठ नेते उत्तमराव देसले, मच्छिंद्र येरडावकर, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अलोक रघुवंशी, पं.स.सदस्य सुरेखा बडगुजर, अर्चना पाटील, बानुबाई शिरसाठ, अलका बिर्हाडे, किरण नगराळे, हरिभाऊ अजळकर, प्रकाश शर्मा, जावेद देशमुख, राकेश मोरे, समाधान मोरे, वाल्मिक वाघ, भिवसन अहिरे, हरीभाऊ चौधरी, शिवाजी अहिरे, भिवसन अहिरे, वाल्मिक वाघ, मुकेश खरात, विश्वास बागुल, प्रकाश पाटील, कपिल जाधव आदी उपस्थित होते.
हेही वाचा :