बीड: देवगाव फाटा येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धाड | पुढारी

बीड: देवगाव फाटा येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धाड

केज: पुढारी वृत्तसेवा : दहिफळ वडमाऊली येथील यात्रेच्या पार्श्वभूमीवर केज पोलिसांनी देवगाव फाटा येथील एका हॉटेलवर धाड टाकून अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी आज (दि.१७) कारवाई केली. पोलिसांना पाहताच हॉटेल चालक महादेव ज्ञानोबा मुंडे (रा. देवगाव) हा पळून गेला. पोलिसांनी हॉटेलची झडती घेतली असता काउंटरमध्ये वायरच्या पिशवीत ४ हजार ७४० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या ४४ बाटल्या आढळून आल्या. केज पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि. १७) केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील वडजू देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव व दिलीप गित्ते यांनी अवैद्य धंद्यांचा शोध सुरू केला होता. यावेळी पोलीस पथकाला अशी माहिती मिळाली की, देवगाव फाट्यावर हॉटेल प्रवीण येथे अवैद्य दारू विक्री सुरू आहे. ही माहिती मिळताच पोलीस पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊन हॉटेल प्रवीणवर धाड टाकली.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामदास तांदळे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button