पुढारी ऑनलाईन डेस्क : २०११ मध्ये भारताला विश्वचषक मिळवून देणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या रणनीतीसमोर अनेक संघ फ्लॉप होतात. धोनीसोबत चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळलेल्या रॉबिन उथप्पाने धोनीच्या रणनीतीबद्दल आपले मत मांडले आहे. "मी जेव्हा सीएसकेविरुद्ध खेळायचो तेव्हा धोनीच्या रणनीतीमुळे मला त्रास व्हायचा, माझी चिडचिड व्हायची, मला त्याचा खूप राग यायचा," असे आश्चर्यचकित करणारे मत त्याने मत व्यक्त केले आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. यावेळीही चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलचे विजेतेपद पटकावेल, अशी चाहत्यांना आशा आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील प्रत्येक सामन्याची रणनीती फलंदाजांना चक्रावून सोडते. आता सीएसकेमध्ये धोनीसोबत खेळणाऱ्या रॉबिन उथप्पानेही धोनीच्या रणनीतीबद्दल मत व्यक्त केले आहे.
उथप्पाने सांगितले की, "धोनीच्या रणनीतीला तोड नाही, जेव्हा मी सीएसकेविरुद्ध खेळायचो, तेव्हा त्याच्या स्ट्रॅटेजीमुळे माझी चिडचिड व्हायची. मला त्याचा खूप राग येत होता. एकदा जोश हेझलवूड माझ्यासमोर गोलंदाजी करत होता आणि माही भाईने त्याच्यासाठी कोणत्याही खेळाडूला फाईन लेगवर ठेवले नव्हते. अशा परिस्थितीत, अंतर पाहून मी विचलित झालो आणि पुढच्या चेंडूवर त्या ठिकाणी शॉट मारताना आऊट झालो. फलंदाजांसोबतच गोलंदाजांनाही वेगळा विचार करायला तो भाग पाडतो. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणे म्हणजे खूप काही शिकण्यासारखे आहे" असेही त्याने म्हटले आहे.
हेही वाचा :