CSK vs MI : मुंबईच्या मैदानात घुमाला धोनी…धोनी… जयघोष (Video Viral)

CSK vs MI : मुंबईच्या मैदानात घुमाला धोनी…धोनी… जयघोष (Video Viral)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील १२ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईे ७ विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईने ८ बाद १५७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सीएसकेने १८.१ षटकात ३ गडी गमावून विजय मिळवला. यावेळी चेन्नईला समर्थन देण्यासाठी मैदानात आलेल्या चाहत्यांनी धोनीच्या नावाचा जयघोष केला. (CSK vs MI)

सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी शानदार खेळ करत सामना ७ गडी राखून जिंकला. विजयासाठी अखेरच्या काही धावा शिल्लक असताना चाहत्यांनी वानखेडे स्टेडियमवर धोनीच्या नावाचा जयघोष सुरू केला. चाहत्यांनी 'वी वॉंट धोनी' अशी घोषणा दिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अखेरच्या काही षटकात धोनी पॅड घालून फलंदाजीसाठी तयार होता. मात्र, ऋतुराज व रायडू यांनीच सामना संपविल्‍याने धोनीला फलंदाजीसाठी मैदानावर येण्‍याची संधी मिळाली.  (CSK vs MI)

सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा व इशान किशन यांनी संघाला जोरदार सुरूवात करून दिली. तुषार देशपांडेने रोहितचा त्रिफळा उडवत संघाला पुनरागमन करून दिले. त्यानंतर मुंबईचे गडी ठराविक अंतराने बाद झाले. जडेजा व सॅंटनर या फिरकी जोडीने मुंबईच्या फलंदाजीला सुरूंग लावला.

टीम डेविडने केलेल्या खेळीमुळे मुंबईने १५७ धावांपर्यंत मजल मारली. विजयासाठी मिळालेल्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कॉनवे पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या अजिंक्य रहाणेने शानदार खेळी करत सामना चेन्नईच्या बाजूने फिरवला. अजिंक्यने केवळ १९ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. रहाणेने २७ बॉममध्ये ६१ धावांची खेळी केली.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news