vaishnavi kalyankar : देवमाणूस २ ची ‘ही’ अभिनेत्री खूपच ग्लॅमरस!

वैष्णवी कल्याणकर
वैष्णवी कल्याणकर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

छोट्या पडद्यावरील 'देवमाणूस-२' ही मालिका सध्या एका अभिनेत्रीमुळे चर्चेत आहे. या नव्या अभिनेत्रीमुळे एकच चर्चा रंगलीय, ती म्हणजे तिच्या सौंदर्याची. मालिकेत नवं पात्र साकारणारी सोनाली म्हणजेच सोनूमुळे नवं ट्विस्ट पाहायला मिळत आहे. 'देवमाणूस-२' मधील सोनूच्या सौंदर्याने सर्वांनाचं घायाळ केलं आहे. ती जितकी सुंदर पडद्यावर दिसते, तितकी सरिअल लाईफमध्येही ग्लॅमरस आहे. ही सोनू म्हणजेच वैष्णवी कल्याणकर हिच्याविषयी जाणून घेऊया नजरेने तीर सोडणारी वैष्णवी कल्याणकर नेमकी आहे तरी कोण?

वैष्णवी कल्याणकर
वैष्णवी कल्याणकर
वैष्णवी कल्याणकर
वैष्णवी कल्याणकर

देवमाणूस मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झालीय. वैष्णवी हिने या मालिकेत सोनाली उर्फ सोनू ही भूमिका साकारलीय. वैष्णवी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटोज आणि व्हिडिओज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतात. खरंतर तिची ही पहिली मालिका आहे. तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे वैष्णवी एक सोशल मीडियावरील स्टार बनलीय.
या मालिकेच्या नव्या प्रोमोतून सोनूची एन्ट्री झालेली दाखवण्यात आली होती.

वैष्णवी कल्याणकर
वैष्णवी कल्याणकर
वैष्णवी कल्याणकर
वैष्णवी कल्याणकर

ही सोनू खूप श्रीमंत असते. आपल्या जागेच्या व्यवहारासाठी ती डॉक्टरची मदत मागायला वाड्यात येते. पण, डॉक्टरची आणि तिची भेट होत नसते. सोनूला बज्या डॉक्टरकडे घेऊन येतो. आणखी एका नव्या प्रोमोत डॉक्टर आणि ती दिसताहेत. सोनूला डॉक्टर जाळ्यात ओढणार का? सोनूचा पुढचा डाव काय असेल, हे आगामी एपिसोडमध्येच समजणार आहे.

वैष्णवी कल्याणकर
वैष्णवी कल्याणकर

कोण आहे वैष्णवी?

वैष्णवी ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहरातली आहे. डी. जी. रुपारेल कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले आहे. वैष्णवीला नृत्य आणि अभिनय करायला आवडतो. धर्मा मुव्हीज क्रिएशनच्या शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील वेबसीरिज, व्हॅलेंटाईन डे आणि धोका, एक परदेसी मेरा अशा व्हिडिओमध्ये देखील ती दिसली होती. तिचे युट्यूबवर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात.

वैष्णवी कल्याणकर
वैष्णवी कल्याणकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news