पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. सर्वच राजकीय पक्ष प्रचार करत असताना आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. कर्नाटकातील मंगळुरु येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्नाटक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व विजय मिळेल, असा दावा केला आहे.
"काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेली सर्व आश्वासने फोल ठरली आहेत. आता जनतेचा विश्वास फक्त पंतप्रधान मोदींच्या हमीवर आहे. मोदींची हमी म्हणजे 'गॅरंटी ऑफ गॅरंटी' असे लोक मानतात. संपूर्ण कर्नाटक पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे. आम्ही येथे विक्रमी विजय मिळवू, असा विश्वात फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा :