Dengue cases : डेंग्यूचा डंख खोल! राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ

Dengue cases : डेंग्यूचा डंख खोल! राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ

पुणे : राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी डेंग्यूचे 8578 रुग्ण आढळून आले होते. यावर्षी
जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीतच रुग्णांची संख्या 8596 पर्यंत पोहोचली आहे. डेंग्यूमुळे होणारे मृत्यू मात्र लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. गेल्या वर्षी 27 जणांचा, तर यावर्षी 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत कीटकजन्य आजारांच्या प्रादूर्भावामध्ये वाढ होते. हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णांचे प्रमाण वाढलेले पहायला मिळते. यंदा दर वर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे. सातत्याने पाऊस पडत नसला तरी पावसामुळे साठणार्‍या पाण्याचे आणि डासोत्पत्ती स्थानांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे कीटकजन्य आजारांचा प्रादूर्भावही पहायला मिळत आहे.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षी दिवाळीपर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी नागरिकांनी निष्काळजीपणा न करता स्वच्छतेचे नियम पाळण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

यावर्षी राज्यात गडचिरोलीमध्ये हिवतापाचे सर्वाधिक 4415 रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर मुंबई आणि ठाण्यामध्ये जास्त रुग्ण आहेत. सिंधुदूर्गमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक 409 रुग्ण असून त्याखालोखाल कोल्हापूर, पालघर, नागपूरचा क्रमांक लागतो. चिकनगुनियाचे सर्वाधिक 69 रुग्ण पुणे जिल्ह्यात असून, सिंधुदूर्गमध्ये 66 रुग्ण आहेत.

काय उपाययोजना कराव्यात?

  • हिवताप समस्याग्रस्त भागांमध्ये विशेष मोहीम.
  • अतिसंवेदनशील निवडक आणि उद्रेकग्रस्त भागांमध्ये सिंथेटिक प्रायारेथ—ाईड गटातील कीटकनाशकांची घरोघरी फवारणी.
  • आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा यांच्यामार्फत ताप रुग्ण सर्वेक्षण.
  • संशयित तापरुग्णांचे नमुने परीक्षणासाठी पाठवणे.
  • सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news