पहिल्या रोबो पायलटची प्रायोगिक चाचणी लवकरच | पुढारी

पहिल्या रोबो पायलटची प्रायोगिक चाचणी लवकरच

सेऊल : भविष्यात रोबो हे विमानाचे पायलट म्हणूनदेखील जबाबदारी पार पाडू शकतात, याचा दाखला देत दक्षिण कोरियात पायबोट हा नवा रोबो तयार करण्यात आला आहे. त्याची लवकरच छोट्या विमानात प्रायोगिक चाचणी होणार आहे.

कोरियन अ‍ॅडव्हॉन्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने पायबोट नावाचा असा ह्युमनॉईड रोबो पायलट तयार केला आहे, जो सर्वसाधारण कॉकपिटमध्ये बसू शकतो आणि कंट्रोल स्टीक व इन्स्ट्रुमेंट पॅनेलचा वापर करत टेकऑफपासून लँडिंगपर्यंत पूर्ण उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण करू शकतो. फ्लिप स्विच करतानादेखील हा रोबो तितकाच कार्यक्षम असेल, असे यावेळी सांगण्यात आले आहे.

पायबोट विमानाची गती आवश्यकतेनुरूप ठेवत विमान रनवेवर सुरक्षितपणे उतरविण्यासाठी सक्षम आहे. शिवाय टेक्सिंग, टेकऑफ, क्रूजिंग, सायकलिंग आणि लँडिंग क्षमतेचे परीक्षण केवळ सिग्युलेटरच्या मदतीने केले गेले आहे आणि यात पायबोट यशस्वी ठरत आले आहे. आता लवकरच याचे परीक्षण छोट्या विमानात केले जाणार आहे. त्यात यश मिळाल्यास याची आणखी भरीव चाचपणी होऊ शकते.

संबंधित बातम्या

फ्लाईट चार्ट आणि इमर्जन्सी प्रोटोकॉल समजून घेण्यासाठी या रोबोंना आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड असणार आहे. आता रोबो पायलट तयार केले जाण्याची ही पहिली वेळ अजिबात नाही. यापूर्वीही असे प्रयोग सातत्याने झाले आहेत. 2016 पासून याची सातत्याने चाचपणी होत आली आहे. 2019 मध्ये रोबो पायलटकडून दोन तासांच्या फ्लाईटची सूत्रे सोपवली गेली होती आणि तो प्रयोग यशस्वी ठरला होता.

पायबोट हा कोरियन इन्स्टिट्यूटने साकारलेला पहिला ह्युमनॉईड रोबो असून, तो एआय टेक्नॉलॉजी वापरतो. अशा ह्युमनॉईड रोबोसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या एअरक्राफ्टमध्ये काहीही बदल करावे लागत नाहीत आणि ऑटोमेटेड फ्लाईटमध्ये ते लगोलग जोडले जाऊ शकतात, असे या प्रकल्पात मोलाचे योगदान देणार्‍या काही पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे.

Back to top button