राज ठाकरेंवर मोक्का लावा, ‘या’ माजी आमदाराची मागणी

राज ठाकरेंवर मोक्का लावा, ‘या’ माजी आमदाराची मागणी

मालेगाव : (जि. नाशिक) ; औरंगाबादच्या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धार्मिक भावना भडकवत धमकीवजा वक्तव्ये केली, त्यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगरप्रमुख तथा मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.

संविधानानुसार प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु, अजान आणि हनुमान चालीसा यावरून धार्मिक भावना भडकविल्या जात आहेत. ठाकरे यांनी भोंग्यांवरून शासनाला 4 तारखेचा अल्टिमेटम देत 'नंतर आम्ही बघू' असा इशारा दिला. धार्मिक भेदभाव कदापि मान्य केला जाणार नाही. ऐक्याला बाधा पोहोचल्यास संबंधितांना वर्षभरासाठी तुरुंगात टाकावे, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news