पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीच्या (Delhi) जामियानानगर आणि शाहीन बाग परिसरातून 90 किलो अंमली पदार्थांसह 30 लाखांची रोख रक्कम आणि काही बेकायदेशीर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. एनसीबीच्या (NCB) दिल्ली युनिटने ही कारवाई केली.
NCB चे डेप्युटी डायरेक्टर जनरल (DDG) ऑपरेशन्स संजय सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेले हेरॉईन अफगाणिस्तानातून आले आहेत आणि हे रॅकेट ड्रग्ज माफियांद्वारे चालवले जात असल्याचा संशय आहे. सिंडिकेट समुद्र आणि भारतीय सीमा मार्गाने अनेक ड्रग्ज माफियांकडून कायदेशीर वस्तू आणि मालवाहू वस्तूंमधून अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. (Delhi)
या ड्रग्ज माफियांचा देखील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटशी संबंध असल्याचा संशय असल्याने एनसीबीने पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणामधील संशंयित ठिकाणांवर छापे टाकले आहेत.
हेही वाचा