Sourav Ganguly | दिल्लीच्या पहिल्या विजयानंतर गांगुलीला आठवला २५ वर्षापूर्वीचा कसोटी सामना

Sourav Ganguly | दिल्लीच्या पहिल्या विजयानंतर गांगुलीला आठवला २५ वर्षापूर्वीचा कसोटी सामना
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात निराशजनक झाली. पहिल्या पाच सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, त्यानंतर गुरुवारी डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शानदार विजय मिळवत अखेर विजयाचे खाते उघडले. डीसीने शेवटच्या षटकात केकेआरचा चार गडी राखून पराभव केला. यासह दिल्लीने (Sourav Ganguly) या मोसमातील पहिल्या विजयची नोंद केली.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक आहेत. डीसीच्या पहिल्या विजयानंतर ते खूप आनंदी दिसत होते. या सामन्यानंतर गांगुलीने एक मोठे विधान करत त्यांनी २५ वर्ष जुन्या कसोटी सामन्याला उजाळा दिला. दिल्लीच्या पहिल्या विजयाबद्दल सामन्यानंतरच्या मुलाखतीदरम्यान गांगुलीने मोठे वक्तव्य केले.

सौरव गांगुलीला विचारण्यात आले की, आयपीएल २०२३ मध्ये पहिला विजय नोंदवल्यानंतर तुमच्या भावना काय आहेत. यावर गांगुलीने २५ वर्षांपूर्वी खेळलेल्या कसोटी सामन्यातील त्यांच्या पहिल्या धावेची आठवण सांगितली. गांगुली म्हणाला की, हा विजय मला २५ वर्षांपूर्वी भारतासाठी पहिल्या कसोटीत काढलेल्या धावांसारखा वाटत होता. याशिवाय आपल्या संघाच्या फलंदाजीबद्दल बोलताना गांगुली म्हणाला की, 'आम्ही यापूर्वीही चांगली गोलंदाजी केली आहे. पण खरी समस्या आमच्या फलंदाजीची आहे. आम्ही चांगला खेळ केला नाही. आम्हाला चांगली फलंदाजी करण्याचा मार्ग शोधावा लागेल.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने दिल्लीसमोर १२८ धावांचे माफक लक्ष्य ठेवले होते. डीसीने ४ गडी आणि ४ चेंडू राखून कोलकाताचा पराभव करत यंदाच्या आयपीएल हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news