पुढारी ऑनलाईन डेस्क
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes) बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादिकोनने धमाकेदार एन्ट्री घेतली. कान्समध्ये गेल्यानंतर तिचा फर्स्ट लूक व्हायरल झाला होता. कान्सच्या पहिल्या दिवशी बॉलिवूड दिवा दीपिका पादुकोणने देसी गर्ल लुक रिवील झाला आहे. कान्समध्ये दीपिकाने आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं आहे. आतापर्यंतचे तिचे दोन लूक समोर आले आहेत. रेट्रो लूकनंतर दीपिकाने कान्स फेस्टिव्हलच्या (Cannes) जुरीसोबत रेड कार्पेटवर वॉक केलं. दीपिकाने शिमरी साडी नेसत इंडियन टच दिला होता.
कान्सच्या रेड कार्पेटवर प्रसिध्द फॅशन डिझायनर सब्यासाचीची ब्लॅक ॲण्ड गोल्ड सीक्वेन साडी घालून दीपिकाने आपल्या अदा दाखवल्या आहेत. या अभिनेत्रीने साडी लूक एक्स्ट्रा स्पेशल करण्यासाठी ड्रामेटिक टच दिलं. दीपिकाने फंकी हेयरबन आणि गोल्डन हेडबँडसोबत हायलाईट केलं. ड्रामेटिक आयलायनर, न्यूड लिप्स, chandelier ईअरिंग्स, रिंग्ससोबत आपला लूक पूर्ण केला आहे.
सिक्विन साडीने दीपिकाच्या सौंदर्यात भर घातली. अभिनेत्रीच्या लुकमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिचा अल्ट्रा बोल्ड आय मेकअप. कान्स फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी दीपिका डोक्यापासून पायापर्यंत सब्यसाची आउटफिट, अॅक्सेसरीजमध्ये दिसली.
यामध्ये दीपिका पदुकोणच्या धमाकेदार लूकची चर्चा होती. सोशल मीडियावर दीपिकाच्या साडीतील लुकला लोकांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. अनेकांना दीपिका साडीत आकर्षक दिसली. दीपिकाच्या सौंदर्याचे कौतुक करताना ते थकत नाहीत. परंतु, असे अनेक लोक आहेत जे दीपिकाच्या लूकने अजिबात प्रभावित झाले नाहीत. मेकअप, अॅक्सेसरीजपासून साडीपर्यंत त्यांनी दीपिकाला ट्रोल केले आहे. दीपिकाच्या लूकमध्ये लोकांना सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे कानातले लांब जड झुमके. एका नेटकऱ्याने तिचे कानातील झुमके पाहून मिश्किलपणे म्हटले -दीपिकाचे ear lobes मदतीसाठी ओरडत आहेत.
तिने सब्यसाची ज्वेलरी बेंगाल रॉयल कलेक्शनमधील झुमके घातले आहेत. सोनेरी रंगाचे हे जड कानातले पाहून यूजर्स मजा घेत आहेत.
दुसर्या नेटकऱ्याने लिहिले – मला दीपिकाच्या कानाबद्दल वाईट वाटते. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले-लोक फॅशनसाठी एवढा छळ का करतात? दीपिकाच्या कानात…
दीपकाच्या आयलायनरवर अनेक ट्रोल्सनीही टीका केली आहे. युजरने लिहिले – मला दीपिकाचा मेकअप अजिबात आवडला नाही. ऐश्वर्याच्या लूकचे कौतुक करताना एका युजरने दीपिकाच्या लूकचे वर्णन स्वस्त असल्याचे म्हटले.