नाशिक पुढारी वृत्तसेवा
आपला देश हा मूळचा हिंदूराष्ट्र आहे. सध्या त्यावर वेगवेगळे दावे सांगितले जात आहेत. देशाला हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करा, अशी मागणी सकल हिंदू हुंकार सभेत विविध साधू-महंतांनी केली. समस्त हिंदूंनी आता एकत्र येणे आवश्यक आहे. आताच आपण जागे झालो नाही तर भविष्यात हे मुघल राष्ट्र होईल. यामध्ये पालकांची भूमिका आवश्यक आहे. त्यांनी योग्य ते हिंदूंचे संस्कार करायला पाहीजे. मुलांना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ज्ञानोबा, तुकाराम यांच्या गोष्टी सांगायला पाहीजे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
गुढीपाडव्याच्या औचित्यावर बुधवारी (दि. २२) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकल हिंदू हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके, आखाडा परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री हरिगिरीजी महाराज, महामंडलेश्वर स्वामी १००८ श्री शांतिगिरीजी महाराज, गुरुमाउली आण्णासाहेब मोरे, राष्ट्रसंत अनंत श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, श्री श्री १००८ महामंडलेश्वर रघुनाथ बाबा (फरशीवाले), डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज, भाजप नेते लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, दिनकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चव्हाणके म्हणाले, नाशिकमधून राष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्यसंग्रामाची सुरुवात झाली. त्यामुळे नाशिक नगरी ही पावन आहे. लव्ह जिहाद, लँड जिहादसारखे प्रश्न सोडविणे ही काळाची गरज आहे. अन्यथा हिंदू राष्ट्र धोक्यात येईल. शहरात अनेक हिंदू मंदिराजवळ मशिद बांधली जात आहे. अतिक्रमण केले जात आहे. शहरातील नवश्या गणपती येथे भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक शहरात बांग्लादेशी सर्च सेल ॲक्टीव्ह असतो, तसा नाशिकमध्ये नाही. तो ॲक्टीव्ह करावा लागणार आहे.
यावेळी मधुस्मिताजी साध्वी म्हणाल्या, चव्हाणके यांनी हिंदूंसाठी उभी केलेली चळवळ महत्वाची आहे. त्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. भारतानंदजी सरस्वती यांनी मराठ्यांचा भगवा दिल्लीच्या तख्तावर नेला पाहीजे. हिंदूंच्या श्रद्धास्थानाच्या आदर सर्वांनाच करावा लागेल. आता तर मोदी आहे म्हणून ठिक आहे, जर योगी आले तर गुगलवर सुद्धा तुम्ही सापडणार नाहीत. सावरकरांना भारतरत्न देणे आवश्यक आहे. कारण भारतरत्न पुरस्काराची उंची वाढेल. येणाऱ्या काळात आम्हाला देशाचा पंतप्रधान भगवाधारी पाहीजे, त्यासाठी चव्हाणके यांचे हात बळकट करावे, असे सांगितले.
जिल्ह्यात लव्हजिहाद मोठ्या प्रमाणावर
वक्ते सुदर्शन चव्हाणके यांनी जिल्ह्यातील लव्ह जिहादच्या प्रकरणांवर भाष्य केले. राज्यात बीड पाठोपाठ नाशिकमध्ये लव्ह जिहादची प्रकरणे नोंदविले गेल्याच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्वत:वर झालेला अन्याय या भूमीतूनच मोडला गेला पाहीजे. असे सांगताना रामायनातील संदर्भ दिले. हे नाते हिंदुत्त्वाशी आहे. हे सत्य पुसण्याचे प्रयत्न अलिकडे होत आहेत. हे प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन चव्हाणके यांनी केले.
हेही वाचा :