पिंपरी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी स्कूल बसचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 20) दुपारी अडीचच्या दरम्यान दिघी परिसरात घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, स्कूल बसचालक (वय 34) यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आठ वर्षीय अल्पवयीन मुलगी आरोपीच्या स्कूलबसने शाळेतून येत होती. दरम्यान, सोमवारी आरोपीने मुलीला बसमधून उतरवून बाजूला नेले. तेथे गैरवर्तन करीत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.