नाशिक : एकलहरे येथे झुडुपांमध्ये आढळला मृत बिबट्या

नाशिक : एकलहरे येथे झुडुपांमध्ये आढळला मृत बिबट्या
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एकलहरे औष्णिक वीज केंद्राच्या काेटमगाव परिसरातील पंपींग स्टेशन जवळील राखेच्या बंधाऱ्यालगत राखीव वनक्षेत्रामध्ये शुक्रवारी (दि.२५) कुझलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळून आला. विशेष म्हणजे मृत बिबट्याचे सर्व अवयव शाबूत होते. वयोमान जास्त झाल्याने त्यातच शिकारी न करता आल्याने मृत बिबट्या अशक्त झाला असावा, त्यातूनच बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

मौजे कोटमगांव येथील बंधाऱ्याजवळील राखीव क्षेत्रातील दाट झुडुपांमध्ये बिबट्या मृतावस्थेत असल्याची माहिती नाशिक वनविभागाला समजली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर बिबट्याचा मृतदेह नाशिकला आणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले.

शवविच्छेदनामध्ये बिबट्याचा मृत्यू वयोमान जास्त झाल्याचे निष्पण झाले आहे. त्यानंतर वनखात्याने अग्निडाग देवून अंत्यसंस्कार केले. तसेच पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, मृत बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या घटनेत तस्करीचा काही एक संबंध नाही. वयाेवृद्ध झाल्यानेच बिबट्याचा मृत्यू झाल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news