DC vs SRH : रोमांचक सामन्यात दिल्लीचा ७ धावांनी विजय

DC vs SRH : रोमांचक सामन्यात दिल्लीचा ७ धावांनी विजय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षर पटेलची अष्टपैलू खेळी आणि मुकेश कुमारने शेवटच्या षटकात केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादला ७ धावांनी पराभूत केले. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्लीने १४४ धावा केल्या आणि हैदराबादसमोर १४५ धावांचे आव्हान ठेवले. दरम्यान दिल्लीच्या १४५ धावांचा पाठलाग करताना हैदराबादला १३७ धावाच करत्या आल्या.

हैदराबादकडून ३९ चेंडूमध्ये ४९ तर हेन्री क्लासिनने १९ चेंडूमध्ये ३१ धावा, आणि वॉशिंग्टन सुंदर अंतिम षटकांत १५ चेंडूमध्ये २४ धावा केल्या. तर दिल्लीकडून नोर्खिया आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २ तर इशांत शर्मा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २ विकेट पटकावल्या.
तत्पूर्वी, मनीष पाडे आणि अक्षर पटेल दोघांनीही ३४ धावा केल्या. याच्या बळावरच दिल्लीला १४४ धावा करता आल्या आहेत. हैदराबादकडून वाशिंग्टन सुंदरने दिल्लीच्या फलंदाजांना अक्षरश: नाचवले. त्याने ४ षटकांमध्ये २८ धावा देत ३ विकेट्स पटकावल्या. वाशिंग्टन सुंदर शिवाय भुवनेश्वर कुमार २ तर टी नटराजनने १ विकेट पटकावली.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news