DC vs CSK : दिल्लीचे चेन्नईला १९२ धावांचे लक्ष्य

DC vs CSK : दिल्लीचे चेन्नईला १९२ धावांचे लक्ष्य
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 192 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. मथिशा पाथिरानाने तीन विकेट घेतल्या.

या सामन्यात पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दिल्ली कॅपिटल्स संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी झाली. चेन्नईला पहिले यश मुस्तफिजुर रहमानने मिळवून दिले. त्याने10व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर वॉर्नरला पाथिरानाकरवी झेलबाद केले. त्याने 35 चेंडूत 52 धावा केल्या.

यादरम्यान त्याने बॅटमधून पाच चौकार आणि तीन षटकार लगावले. पुढच्याच षटकात दिल्लीची दुसरी विकेट पडली. रवींद्र जडेजाने सेट फलंदाज पृथ्वी शॉला धोनीकरवी झेलबाद केले. या मोसमातील पहिला आयपीएल सामना खेळणाऱ्या शॉने चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या.

आयपीएलच्या 13व्या सामन्यात मथिशा पाथिरानाची घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याने ऋषभ पंत आणि मिचेल मार्श यांच्यातील 134 धावांची भागीदारी मोडली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी झाली. मार्शला मथिशा पाथिरानाने ताशी 150 किमी वेगाने बॉलिंग केले. या स्टार अष्टपैलू खेळाडूने 12 चेंडूंचा सामना करत 18 धावा केल्या. याच्या पाथीरानाने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सला आपला बळी बनवले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी संघाचा कर्णधार पंतही दमदार खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मैदानात परतल्यानंतर त्याने पहिले अर्धशतक झळकावले. या स्टार खेळाडूने 32 चेंडूत 51 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि तीन षटकार आले. चेन्नईविरुद्ध अक्षर पटेल सात धावा करून नाबाद राहिला आणि अभिषेक पोरेल नऊ धावा करून नाबाद राहिला. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने तीन बळी घेतले. त्याने प्राणघातक गोलंदाजी केली. तर मुस्तफिजुर रहमान आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

इम्पॅक्ट प्लेयर : सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, रसिक दार सलाम, प्रवीण दुबे, जेक फ्रेझर-मॅकगुर्क.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना, मुस्तफिजुर रहमान.

इम्पॅक्ट प्लेयर : शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, मोईन अली, मिचेल सँटनर.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news