GT vs SRH : गुजरातचा हैदराबादवर सात गडी राखून विजय

GT vs SRH : गुजरातचा हैदराबादवर सात गडी राखून विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 च्या 12 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा सात विकेट्सने पराभव केला.हैदराबादने दिलेल्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने 7 गडी गमावून हे आव्हान पार केले. यामध्ये गुजरातच्या साई सुर्दशनच्या 45 धावांच्या खेळीने गुजरातचा विजय सुखकर बनवला.  (GT vs SRH)

हैदाराबादने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या सलमीरांनी सुरूवातीपासून फटकेबाजी करून संघाला आक्रमक सुरूवात करून दिली. यामध्ये शुभमन गिलने ३६ तर साहाने 25 धावा केल्या. यानंतर मिलरने २७ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावा केल्या. तर विजय शंकर ११ चेंडूत १४ धावा करून नाबाद राहिला. साई सुदर्शनने 45 धावांची आक्रमक खेळी केली. या विजयासह गुजरात टायटन्सने तीन सामन्यात दोन विजय मिळवून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. गोलंदाजीमध्ये हैदराबादच्या शाहबाद अहमद. मयांक करांडे आणि पॅट कमिंन्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  हैदराबादने आपल्‍या डावाची सावध सुरुवात केली. सनरायझर्स हैदराबादला पहिला धक्का पाचव्या षटकात 34 धावांवर बसला. मयंक अग्रवालला अजमतुल्ला उमरझाईने दर्शन नळकांडेच्या हाती झेलबाद केले. 17 चेंडूत 16 धावा करून तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. डावातील पहिली सहा षटकांमध्‍ये ( पॉवरप्ले) हैदराबादने १ गडी गमावत ५६ धावा केल्‍यायानंतर सातव्या षटकात  ५८ धावांवर फिरकीपटू नूर अहमदने हैदराबादला दुसरा धक्‍का दिला. त्‍याने  ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. (GT vs SRH)

सावरलेला डाव गडगडला

10 षटकांनंतर सनरायझर्स हैदराबादने तीन गडी गमावून 74 धावा केल्या. मोहित शर्माने अभिषेक शर्माला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. त्याला 20 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 29 धावा केल्‍या. हैदराबादने 13 षटकांत 3 गडी गमावत 104 धावा केल्‍या.  १४ व्‍या षटकात सनरायझर्सला 108 धावांवर चौथा धक्का. २४ धावांवर खेळणार्‍या क्‍लासेनला गुजरातचा फिरकीपटू रशीद खानने क्‍लीन बोल्‍ड केले. सनरायझर्स हैदराबादला 15व्या षटकात 114 धावांवर पाचवा धक्का बसला. एडन मार्करामला उमेश यादवने राशिद खानकरवी झेलबाद केले. त्याने 19 चेंडूत 17 धावा केल्‍या. समद याने उमेशच्या लागोपाठ दोन चेंडूंवर दोन चौकार मारले. 15 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 122 धावा इतकी हाेती. हैदराबादने 13 षटकांत 3 गडी गमावत 104 धावा केल्‍या होत्‍या. मात्र पुढील चार षटकात गुजरातच्‍या गाेलंदाजांनी कमबॅक केले.  चार षटकात दाेन बळी घेत  केवळ ३३ धावा दिल्‍या.

अखेरच्‍या षटकात हैदराबादने तीन  विकेट गमावल्‍या

हैदराबाद संघाने 20 व्या षटकात तीन विकेट गमावल्या. शेवटचे षटक टाकण्यासाठी मोहित शर्मा आला. या षटकात त्याने फक्त तीन धावा दिल्या. तसेच दोन विकेट्स घेतल्या. अखेरच्या चेंडूवर अब्दुल समद धावबाद झाला. मोहितने एकूण तीन विकेट घेतल्या. त्याचवेळी समदने हैदराबादसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने 14 चेंडूत 29 धावांची खेळी खेळली. अभिषेकने 20 चेंडूत 29 धावांची खेळी केली. संघाने 20 षटकांत आठ गडी गमावून 162 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादने गुजरात टायटन्ससमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news