पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलती जीवनशैली, आपलं स्वत:चं आरोग्याकडे लक्ष नसल्याने काही वेळा महिलांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला स्किन केअर रूटीन फॉलो करणं खूप गरजेचं असतं. (Dark Circles Under Your Eyes ) यासाठी तुम्हाला डोळ्यांखालील त्वचेचीदेखील काळजी घ्यावी लागेल. आपण पाहतो की, अनेक महिलांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे किंवा ज्याला आपण म्हणू डार्क सर्कल असतात. काहींना डोळ्यांखाली बारीक पुरळदेखील येतात. खासकरून चष्मा वापरणाऱ्या किंवा ज्यांची झोप होत नाही, अशा महिलांनाही या समस्यांना सामोरं जावं लागतं. (Dark Circles Under Your Eyes)
त्वचेची देखभाल करण्यासाठी आपण काय काय करत नाही. स्किन केअर ते पार्लरपर्यंत आपण सव काही करतो. पण, तात्पुरताचं आपल्या स्किनवर ग्लो दिसतो. पुन्हा काही दिवसांनी डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतातचं. आपली त्वचा खूप सेन्सिटिव्ह असल्याने त्याप्रकारची स्किन केअर रूटीन फॉलो करणं खूप गरजेचं असतं. यामुळे तुमच्या डोळ्यांखाली येणाऱ्या काळ्या वर्तुळांपासून बचाव होईल.
अंडर आय मास्क डोळ्यांखालील त्वचेमध्ये उपस्थित सेल्सना कुलिंग इफेक्ट देण्यासाठी मदत करते. खासकरून अंडर आय मास्कचा वापर डोळ्यांखालील पफीनेस कमी करतो. त्याचसोबत सातत्याने हा मास्क वापरलास, डार्क सर्कलची समस्या होणार नाही. तुमची डोळ्यांखालील स्किनदेखील हेल्दी राहील.
डोळ्यांखाली अंडर आय क्रीम लावा. रोज क्रीमचा वापर केल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे राहणार नाहीत. क्रीम लावताना तुम्हाला हलक्या हातांनी थोडासा दाब देऊन मसाज करायला हवा. क्रीम त्वचेच्या आतपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा दाब द्यावा, घासू नये.
रात्री झोपताना ती-चार थंब बदाम तेल हाताच्या बोटावर घेऊन रात्री झोपताना डोळ्याखाली लावावे. जोपर्यंत काळी वर्तुळे जात नाहीत, तोपर्यंत बदाम तेलचा वापर करावा.
पुरेशी झोप घ्यावी. त्याचसोबत सकाळी झोपेतून उठल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. दिवसांतून साध्या पाण्याने किमान तीनवेळा चेहरा धुवावा.
एका तासासाठी त्या जागी एलोवेरा जेल लावावे. तसेच काकडी स्लाईसदेखील तुम्ही डेळ्यांवर ठेऊ शकता. यामधील अँटीऑक्सीडेंट तत्व डोळ्यांखालील काळी त्वचा दूर करण्यासाठी मदत करते.
हे उपाय आठवड्यातून दोन वेळा करावे, तुम्हाला डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळेल.