Dalai Lama: न्यूझीलंड टीममधील खेळाडूंनी सहकुटुंब घेतली दलाई लामांची भेट

Dalai Lama
Dalai Lama
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी त्यांचा कुटुंबासह तिबेटचे अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांची आज भेट घेतली. खेळाडूंनी सहकुटूंब दलाई लामा यांच्या हिमाचल प्रदेश येथील मॅक्लॉडगंज येथील निवासस्थानी भेट घेतली आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक क्रीडा स्पर्धेत भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. यानंतर न्यूझीलंड संघातील काही खेळाडूंसह भारतीय खेळाडूंनीदेखील दलाई लामांची भेट घेतली. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Dalai Lama)

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सध्या भारतात सुरू आहेत. रविवारी (दि.२२) न्यूझीलंड विरूद्ध भारत सामना धरमशाळा शहरातील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडला. यामध्ये भारताने विजय मिळवला. त्यानंतर शनिवारी (दि.२८ ऑक्टोबर) न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामना हिमाचल प्रदेशातील याच स्टेडियमवर होणार आहे. (Dalai Lama)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news