पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहरूख खान याला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह जवान सिनेमातील अभिनेत्री नयतारालाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना शाहरुख खान भावूक झाला होता. यावेळी त्याने चित्रपटाशी संबंधित सर्वांचे आभार मानले. मंगळवारी मुंबईमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे वितरण झाले. (Dadasaheb Phalke Film Awards 2024)
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारतीय चित्रपटसृष्टीमधील महत्वाच्या पुरस्कार सोहळ्यापैकी एक आहे. बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील अभिनेते या पुरस्कार सोहळ्याची वाट पाहत असतात. या पुरस्काराच्या रूपाने वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ कलाकारांना मिळत असते. मंगळवारी (दि.२०) बॉलिवूड नगरी मुंबई येथे या पुरस्कार सोहळ्याचे वितरण झाले.
या सोहळ्यात बॉलिवडूचा किंग खान शाहरुख खानला जवान चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. यावेळी शाहरुख खानने ज्यूरीचे आभार व्यक्त केले. यासह आभार मानताना तो भावूक झाला. यावेळी त्याने चित्रपटाशी संबंधित सर्वांचे आभार मानले. तर अभिनेता बॉबी देओल आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना ॲनिमल चित्रपटासाठी गौरवण्यात आले. (Dadasaheb Phalke Award 2024)
या दिमाखदार सोहळ्याला शाहरुख खानसह बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. या पुरस्कार सोहळ्यावर ॲनिमल आणि जवान चित्रपटाचे वर्चस्व राहिले. यांच्याशिवाय विकी कौशलला सॅम बहादूर या चित्रपटासाठी गौरवण्यात आले. (Dadasaheb Phalke Film Awards 2024)
हेही वाचा :