Cyclone Tej : ‘तेज’ चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार! IMD कडून मच्छिमारांना इशारा

Cyclone Tej
Cyclone Tej

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.  शनिवारी (दि.२१) कमी दाब क्षेत्राचे 'तेज' चक्रीवादळात रूपांतर झाले. आज (दि.२२) दुपारी हे चक्रीवादळ तीव्र बनले आहे.  उद्या सोमवारी  'तेज' या चक्रीवादळाची आणखी तीव्रता वाढेल, अशी शक्यता IMD चे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी वर्तवली असल्‍याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. (Cyclone Tej)

डॉ. मोहापात्रा यांनी 'एएनआय'ला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, तेज चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोमवार २३ ते बुधवार २५ ऑक्टोबरपर्यंत ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मध्यम ते हलका पाऊस अपेक्षित आहे. दरम्यान, समुद्र खवळलेला असल्याने स्थिती अत्यंत धोकादायक असणार आहे. या भागात मच्छिमार आणि जहाजांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे समुद्रात गेलेल्यांना परतीचा इशारा देण्यात येत आहेर मच्छिमारांना या कालावधीत समुद्रात जावू नये, असे सांगण्यात येत असल्याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. (Cyclone Tej)

भारतीय हवामान विभागाने (IMD) नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील कमी दाब चक्रीवादळ 'तेज' रविवारी ओमान आणि येमेनच्या किनारपट्टीजवळ 'अत्यंत तीव्र' झाले आहे. ते उद्यापर्यंत आणखी तीव्र बनण्याची अधिक शक्यता आहे. हे चक्रीवादळ मंगळवारी(दि.२४) दुपारच्या सुमारास अल घैदाह (येमेन) आणि सलालाह (ओमान) दरम्यान "खूप तीव्र चक्रीवादळ" म्हणून किनारा ओलांडेल. असेही डॉ. मोहापात्रा यांनी स्पष्ट केले आहे. ((Cyclone Tej))

'या' राज्‍यांमध्‍ये मुसळधार पावसाची शक्‍यता

'तेज' चक्रीवादळाचा राज्यावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु केरळ ते तामिळनाडूच्या किनापट्टीच्या भागात दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळेल. तसेच आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम या राज्यांत मोठा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news