Tej Cyclone : अरबी समुद्रातील ‘तेज’ चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने; मुंबई, कोकणचा धोका टळला | पुढारी

Tej Cyclone : अरबी समुद्रातील 'तेज' चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने; मुंबई, कोकणचा धोका टळला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्रात तयार झालेले तेज चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने सरकले आहे. पाकिस्तानच्या नैऋत्येला 1850 किमी अंतरावर कराचीदरम्यान वादळाची व्याप्ती असल्याचे पाकिस्तानच्या हवामान खात्याने (PMD) शनिवारी सांगितले.

हे चक्रीवादळ 89-117 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पुढे सरकत असून रविवारपर्यंत (22 ऑक्टोबर) वादळाचे ‘तीव्र चक्री वादळा’ मध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. तेज चक्रीवादळ सध्या नैऋत्य अरबी समुद्रातील येमेनच्या सोकोत्रा ​​येथून 600 किमी पूर्व-आग्नेयेस पुढील काही तासांमध्ये तीव्र बनण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ हे 25 ऑक्टोबर रोजी येमेन आणि ओमान दरम्यान लँडफॉल करेल, आयएमडीने म्हटले आहे. हवामानाच्या ताज्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून याचा परिणाम दक्षिणेकडील हवामानावर होईल. त्यामुळे तामिळनाडूत वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे.

 

Back to top button