Cyclone Mocha : ‘मोचा’ वादळाने धारण केले रौद्र रुप; ‘या’ ठिकाणांना बसणार तडाखा

Cyclone Mocha : ‘मोचा’ वादळाने धारण केले रौद्र रुप; ‘या’ ठिकाणांना बसणार तडाखा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'मोचा' वादळ आता धोकादायक रूप धारण करत आहे. बंगालच्या खाडीमध्ये मागील आठ तासापांसून जोरदार वारे वाहत आहेत. आठ किलो मीटर प्रती तासा या वेगाने हे वादळ अग्नेयाकडून वायव्येकडे सरकत आहेत. हे मोचा वादळ आता धोकादायक चक्रीवादळाचे रुप धारण करु लागले आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार बंगालच्या उपसागरात वेगवान वाऱ्यांचे 'मोचा' चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. आज, गुरुवारी (11 मे) मध्यरात्री तो तीव्र चक्री वादळाचे रूप धारण करू शकेल. त्यामुळे बांगलादेश आणि म्यानमारमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यासह इशान्ये कडील राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय या वादळामुळे बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Cyclone Mocha)

'मोचा'मुळे अंदमानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ सकाळी 8.30 वाजता पोर्ट ब्लेअरच्या नैऋत्येला 510 किमी अंतरावर होते. आज रात्री या वादळाचे तीव्र चक्री वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. (Cyclone Mocha)

हे चक्रीवादळ 13 मे रोजी संध्याकाळी आपल्या उच्चांकावर पोहोचेल आणि त्यानंतर 14 मेच्या सकाळपासून ते किंचित कमकुवत होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तवली आहे. हे वादळ ताशी १२०-१३० किलोमीटर वेगाने कॉक्स बाजार आणि क्योकपुय दरम्यान आग्नेय बांगलादेश आणि उत्तर म्यानमारचा किनारा ओलांडण्याची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे.

म्यानमार आणि बांगलादेशमध्ये इव्हॅक्युएशन ऑर्डर जारी

म्यानमार आणि बांगलादेशातील सखल भागातून लोकांना बाहेर काढले जात आहे. बांगलादेशनेही मासेमारी नौकांना खोल समुद्रात जाण्यास बंदी घातली आहे. यापूर्वी, बांगलादेशला नोव्हेंबर 2007 मध्ये वादळाचा तडाखा बसला होता. तेव्हा चक्रीवादळ सिद्राने (Cyclone Sidr) देशाच्या नैऋत्येला उद्ध्वस्त केले होते. त्यावेळी 3 हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मे 2008 मध्ये नर्गिस चक्रीवादळाने (Cyclone Nargis) म्यानमारला मोठा तडाखा दिला होता. यामध्ये १ लाखाहून अधिक लोक मरण पावले व हजारो लोक बेपत्ता झाले होते.


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news